पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. काही काळापूर्वी करुणा शर्मा यांच्या सोबतचे नाते धनंजय मुंडे यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर करुणा शर्मा या सातत्याने चर्चेत राहिल्या आहेत. पण आता करुणा शर्मा यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील येरवडा भागातील एका २३ वर्षीय महिलेने करुणा शर्मा यांच्या फिर्याद दिली आहे. या फिर्यादी मध्ये म्हटले आहे की, महिलेचा पती आणि करुणा शर्मा यांच्यावर शस्त्राचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ करणे, अपहरण करून पतीसोबत घटस्फोट घेऊन जीवे मारण्याची धमकी देणे या प्रकारचे गंभीर आरोप फिर्यादी महिलेने केले आहेत. या प्रकरणावरून फिर्यादीचा पती तिचा छळ करत होता. मी करुणासोबत लग्न करणार आहे, तू मला घटस्फोट दे असे सांगून फिर्यादी महिलेच्या पतीने तिला माहेरी सोडले होते.

कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा रस्ता वाहतूकीसाठी बंद, पर्यटकांची होणार गैरसोय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि तिचा पती हे मूळचे उस्मानाबाद येथील आहे. २०११ च्या नोव्हेंबर महिन्यात फिर्यादी महिलेच्या पतीची आणि करुणा शर्मा यांची ओळख झाली होती. यानंतर या महिलेचा पती वारंवार करुणा शर्मा यांच्या संपर्कात राहू लागला. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. पती सतत करुणा शर्मा यांच्याशी बोलत असल्याने महिलेने याबाबत विचारले असता, त्याने करुणा शर्मा यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. असे फिर्यादी मध्ये म्हटले आहे.

मुंबईतील सांताक्रूझ भागातील ग्रीन इमारतीत करुणा शर्मा यांच्या घरी फिर्यादी महिला ३ जून रोजी पतीच्या शोधत गेली होती. याठिकाणी पतीने करुणा शर्मा यांना फोन लावला, यानंतर करुणा शर्मा यांनी महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून पतीला घटस्फोट दे नाहीतर जीवे मारीन अशी धमकी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव करत आहेत.

विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; शेवटच्या क्षणी ‘तो’ आमदार मुंबईत झाला दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here