मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाची वेळ जवळ आल्याने सर्वपक्षीय आमदार आता विधान भवनात दाखल होत असतानाच आदित्य ठाकरे आणि शिवसेना आमदारांची बस ट्रॅफिकमध्ये अडकल्याची माहिती आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर नेहमीपेक्षा वाहतूक मंदावली असून यामुळे मतदानासाठी पोहोचत असलेल्या आमदारांनाही विलंब होत आहे.

राष्ट्रवादीच्या चार आमदारांचे मतदान झाले असून आदित्य ठाकरे यांसह आमदारांची बस मात्र ट्रॅफीकमध्ये अडकल्याची माहिती आहे. या बसमध्ये शिवसेनेचे आमदार आणि आदित्य ठाकरे हे विधान भवनाकडे प्रवास करत आहेत. पण वाहतूक कोंडीमुळे सेना आमदारांना विलंब होत आहे.

करुणा शर्मा-मुंडेंच्या अडचणी वाढल्या, पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा पुण्यातील महिलेचा आरोप
दरम्यान, आज मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये पावसानं हजेरी लावली. यामुळे रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते. सकाळी पाऊस सुरू झाल्याने चाकरमान्यांनाही मनस्ताप सहन करावा लागतोय, याचाच फटका सेनेच्या आमदारांनाही बसला आहे.

कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा रस्ता वाहतूकीसाठी बंद, पर्यटकांची होणार गैरसोय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here