लातूर : गेल्या काही महिन्यापूर्वी लातूरमध्ये एका बारावीतील विद्यार्थ्यांचा कत्तीने वार करून भर दिवसा खून करण्यात आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा या शिक्षणाच्या पंढरीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. इथं बारावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवरून शिवी दिली म्हणून त्याचे सिने स्टाईल अपहरण करत त्याला चक्क नग्न करून अमानुषपणे मारहाण केली.
एक शांत शहर म्हणून लातूरची ओळख आहे. त्यात शिक्षण क्षेत्रात लातूरने वेगळा पॅटर्न निर्माण केला. त्यामुळे शहरात बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, येथील वाढत्या गुन्हेगारीमुळे विद्यार्थ्यांमध्ये दहशत होत असून यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.