Vidhanparishad Election 2022 | दहाव्या जागेवरून निवडून येण्यासाठी भाजपच्या प्रसाद लाड यांच्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची मतं निश्चितच निर्णायक ठरतील. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी काहीवेळापूर्वीच मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
हायलाइट्स:
- मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना पुन्हा एकदा मुंबईत पाचारण करण्यात आले आहे
- लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे
- लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची मतं निश्चितच निर्णायक ठरतील
या टीकेला लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘सामना’मधून काय आरोप करण्यात आले ते मला माहिती नाही. पण पक्षाने आम्हाला स्पष्ट सांगितले होते की, तब्येत ठीक नसेल तर येऊ नका, अशी माहिती शंकर जगताप यांनी दिली. दहाव्या जागेवरून निवडून येण्यासाठी भाजपच्या प्रसाद लाड यांच्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची मतं निश्चितच निर्णायक ठरतील. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी काहीवेळापूर्वीच मुंबईत दाखल झाले होते. लक्ष्मण जगताप यांनी नुकतेच मतदानही केले आहे.
‘सामना’तून भाजपवर नेमकी काय टीका?
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी नाही. त्याचवेळी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोन आमदारांना अत्यंत नाजूक स्थितीस मतदानासाठी उचलून आणले जात आहे. हे दोन्ही आमदार कर्करोगाशी झुंजत आहेत. व्हेंटिलेटर त्यांचा श्वास आहे, असे म्हणतात. पण राजकीय स्वार्थ असला की, माणुसकी तुडवून त्यांना स्ट्रेचर आणि व्हीलचेअरवरून मतांसाठी आणले जात आहे. विजयाची आणि चमत्काराची इतकीच खात्री असताना हे अमानुष, अघोरी प्रयोग कशासाठी? पण राजकीय फायद्यासाठी भाजप कोणत्याही अमानुष थरापर्यंत घसरू शकतो, असे ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : bjp mla laxman jagtap brother hits back shivsena over mlc elections 2022 vidhanparishad election 2022
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network