मुंबई : राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली आहे. आज पहाटेपासूनच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईतल्या अनेक उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. इतकंच नाही तर आज हवामान खात्याकडून या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याकडून अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस कोसळेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता असून पुण्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. यामुळे घाट माथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावली. करुणा शर्मा-मुंडेंच्या अडचणी वाढल्या, पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा पुण्यातील महिलेचा आरोप
मुंबई, ठाणे, रायगड, कोकण या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान पुणे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, साताऱ्यामध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातल्या काही भागातही तुरळक पाऊस होईल तर पुण्याच्या घाट परिसरात २४ तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला तर पुढेही पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. दरम्यान, हिंगोली, अकोला, यवतमाळ, इंदापुर या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.