विधान परिषद निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मग अशावेळी भाजप पक्ष मागे कसा राहणार? पक्षाने दिलेले आदेश पाळणे, हे आमच्या रक्तामध्येच भिनलं आहे. त्यामुळे मी आज पक्षाच्या मतदानासाठी जात आहे, अशी प्रतिक्रिया मुक्ता टिळक यांनी दिली. मुक्ता टिळक यांनी दाखवलेल्या या इच्छाशक्तीचे प्रचंड कौतुक होत आहे. आपल्या पक्षावर किती निष्ठा असावी, हे मुक्ता टिळक यांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिले आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election LIVE: विधानपरिषद निवडणूक २०२२
मुक्ता टिळक या गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. राज्यसभा निवडणुकी वेळीही मुक्ता टिळक या मुंबईला मतदानासाठी गेल्या होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेचा विजय मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित केला होता. तर, खासदार अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी देखील आपला विजय मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित केला होता.
‘सामना’तून भाजपवर टीका
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी नाही. त्याचवेळी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोन आमदारांना अत्यंत नाजूक स्थितीस मतदानासाठी उचलून आणले जात आहे. हे दोन्ही आमदार कर्करोगाशी झुंजत आहेत. व्हेंटिलेटर त्यांचा श्वास आहे, असे म्हणतात. पण राजकीय स्वार्थ असला की, माणुसकी तुडवून त्यांना स्ट्रेचर आणि व्हीलचेअरवरून मतांसाठी आणले जात आहे. विजयाची आणि चमत्काराची इतकीच खात्री असताना हे अमानुष, अघोरी प्रयोग कशासाठी? पण राजकीय फायद्यासाठी भाजप कोणत्याही अमानुष थरापर्यंत घसरू शकतो, असे ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे.