मतदानापूर्वी कॉंग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
राज्यसभेच्या चुरशीच्या लढाईनंतर आज विधान परिषदेच्या १० जागांसाठी भाजप-महाविकास आघाडीत पुन्हा संघर्ष होतो आहे. आवश्यक संख्याबळ नसतानाही विविध डावपेच आणि राज्यसभा निकालाने दिलेल्या कॉन्फिडन्सच्या बळावर फडणवीसांनी पाचवा उमेदवार जिंकून आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल रात्री उशिरापर्यंत बैठका घेऊन आमदारांमध्ये जान भरली. शिवसेना सोडता सर्वच पक्षांना अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करावी लागत आहे.
मतदान सुरु होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात दाखल झाले. त्यांनी अनिल परब आणि अनिल देसाई यांच्याकडून सकाळच्या घडामोडींची माहिती घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सेना आमदारांना मार्गदर्शन केलं. मतदान करताना ५ आमदारांच्या गटाने मतदान करावं. मतदान करताना कुणीही गडबड करु नये. ज्या प्रमाणे मतदानाच्या सूचना दिल्यात, त्याची अंमलबजावणी करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिल्या.
इकडे सकाळी ११ वाजता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे काही आमदारांना घेऊन बसमधून विधिमंडळात पोहोचले. त्यानंतर आमदारांचा गट मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचला. यावेळीही मुख्यमंत्र्यांनी आमदारांना योग्य त्या सूचना केल्या. मतदान करेपर्यंत आदित्य ठाकरेही आमदारांच्या गटांना मतदानासंबंधी सूचना देत होते. प्रिफरेन्शिल वोटिंग करताना गडबड होऊ नये, मत बाद होऊ नये, यासाठी आवश्यक ती सगळी काळजी घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आदित्य ठाकरे जातीने करत होते.