Vidhan Parishad Election 2022 | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू झालेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया पार पडेल. त्यानंतर पाच वाजल्यापासून विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होईल. महाविकास आघाडी सरकार हे फक्त मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसाठी काम करत आहे. त्यांच्याकडून आमदारांकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अनेक आमदार ठाकरे सरकारवर नाराज आहेत.

हायलाइट्स:
- विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
- अनेक आमदार ठाकरे सरकारवर नाराज
- तिघांच्या भेटीमागचा नेमका उद्देश अद्याप कळू शकलेला नाही
मात्र, चंद्रशेखर बावनकुळे आज सकाळपासूनच भाजपचे पाचही उमेदवार जिंकणार, या आत्मविश्वासाने वावरत आहेत. काहीवेळापूर्वीच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील. प्रसाद लाड हे पाचव्या जागेवरून सर्वाधिक मतांनी विजय होतील. महाविकास आघाडी सरकार हे फक्त मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसाठी काम करत आहे. त्यांच्याकडून आमदारांकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अनेक आमदार ठाकरे सरकारवर नाराज आहेत. हे आमदार विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मतदान करतील, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
फडणवीस काँग्रेसच्या नेत्यांना भेटतात तेव्हा…
विधान परिषदेच्या निवडणुकीत एका-एका मतासाठी प्रत्येक उमेदवार प्रयत्न करत असताना विधिमंडळात एक मजेदार प्रसंग घडला. अचनाकपणे समोर आलेल्या काँग्रेस नेत्यांना पाहून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी गुगली टाकली. ‘आम्हाला वाटलं आमची तीन मतं इकडं आहेत’, असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांनी मारलेला षटकार पाहून मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण, बंटी पाटील पोट धरुन हसले. यावर सतेज पाटलांनीही प्रत्युत्तर दिले. ‘तो मी नव्हेच’, असं सतेज पाटील म्हणताच फडणवीस, दरेकर खो खो हसले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : bjp leader chandrashekhar bawankule meet ajit pawar and eknath khadse during voting of vidhan parishad election 2022
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network