मुंबई: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे दोन्ही बाजुंकडून आपल्या आजारी असलेल्या आमदारांनाही मतदानासाठी बोलावण्यात आले आहे. यावेळी महाविकास आघाडीचे मंत्री शंकरराव गडाख ( Shannkarrao Gadakh ) यांना तर मतदान केंद्रातून थेट रुग्णालयात जावे लागले. शंकरराव गडाख हे विधानपरिषदेच्या मतदानासाठी मुंबईच्या दिशेने येत असताना रस्त्यावर त्यांची गाडी स्लीप झाली. त्यामुळे शंकरराव गडाख यांच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे गडाख यांच्या पाठीत तीव्र वेदना जाणवत होत्या. (Vidhan Parisahd Election)

मात्र, विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान करणे भाग असल्याने सोमवारी सकाळी शंकरराव गडाख विधानभवनात आले. यावेळी ते आपल्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून आधार घेऊन चालत होते. त्यांना एक-एक पाऊल टाकतनाही वेदना जाणवत होत्या. त्यामुळे शंकरराव गडाख कसेबसे हळुहळू चालत मतदान केंद्रापर्यंत पोहोचले. मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर शंकरराव गडाख यांनी थेट रिलायन्स रुग्णालय गाठले.

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्याकडूनही मतदान

भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे दोघेही सध्या गंभीर आजाराशी लढा देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे दोघे रुग्णशय्येवर आहेत. मात्र, इतकी बिकट परिस्थिती असूनही या दोघांनीही राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषद निवडणुकीतही मतदानाचा हक्क बजावला. विधानपरिषदेच्या पाचव्या जागेवरील भाजपला उमेदवार निवडून येण्यासाठी या दोघांची मतं निर्णायक ठरू शकतात. मुक्ता टिळक यांनी पुण्यातून निघताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा मुक्ता टिळक यांच्या बोलतानाही धाप लागत होती. मात्र, अशा अवस्थेमध्येही मुक्ता टिळक या पुण्याहून मुंबई असा प्रवास करत विधानभवनात जाऊन मतदान केले.
Vidhan Parishad Election 2022: पक्षाने आम्हाला ‘तो’ पर्याय दिला होता; लक्ष्मण जगतापांच्या भावाचं शिवसेनेला प्रत्युत्तर
विधान परिषद निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मग अशावेळी भाजप पक्ष मागे कसा राहणार? पक्षाने दिलेले आदेश पाळणे, हे आमच्या रक्तामध्येच भिनलं आहे. त्यामुळे मी आज पक्षाच्या मतदानासाठी जात आहे, अशी प्रतिक्रिया मुक्ता टिळक यांनी दिली. मुक्ता टिळक यांनी दाखवलेल्या या इच्छाशक्तीचे प्रचंड कौतुक होत आहे. आपल्या पक्षावर किती निष्ठा असावी, हे मुक्ता टिळक यांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here