विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणूक चुरशीची होत आहे. दहाव्या जागेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत आहे. या निवडणुकीत लहान पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे.

हायलाइट्स:
- विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान
- १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात
- लहान पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष
बविआचे विधानसभेत तीन आमदार आहेत. पैकी क्षितीज ठाकूर न्यूयॉर्कला गेले होते. ते पहाटेच मुंबईत दाखल झाले आहेत. हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी कोणत्या पक्षाला मतदान करणार याबद्दल राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. अनेक पक्षांचे नेते पाठिंब्यासाठी मला भेटून गेले. आम्ही तुम्हाला सहकार्य करू, अशी आश्वासनं अशा निवडणुकीवेळी सगळेच देत असतात. तशीच आश्वासनं यावेळीही देण्यात आली, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.
खालावलेली तब्येत, जड आवाज; व्हिलचेअरवर बसून मुक्ता टिळक मुंबईला रवाना
यावेळी हितेंद्र ठाकूर यांना घोडेबाजाराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ‘निवडणुकीत घोडेबाजार झाला असेल तर तसं जाहीर करावं. त्याची चौकशी करावी. कोणी काय घोडेबाजार केला ते एकदा जाहीर करून टाकावं. मी अमुकाकडून अमूक घेतलं. तमुकाकडून तमूक घेतलं, असं स्पष्टपणे सांगावं,’ असं ठाकूर यांनी म्हटलं. पुढच्यावेळी आपण महालक्ष्मीलाच मतदान घेऊ. महालक्ष्मीला मोठं रेसकोर्स आहे. तिकडे घोडेबाजार होईल, असं विधान त्यांनी केलं.
ठाकूर यांच्या निशाण्यावर राऊत?
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवारांचा पराभव झाला. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांबद्दल नाराजी व्यक्त केली. राज्यसभा निवडणुकीत मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. पण घोडेबाजारात उभे होते, त्यांची सहा सात मतं आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची ३३ मतं मिळाली. हा सुद्धा आमचा एक विजय आहे. ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांची मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network