agneepath scheme protest news today: अग्निपथ योजनेमुळे महाराष्ट्रात वातावरण तापलं, पुण्यात राष्ट्रवादी रस्त्यावर – agneepath scheme protest maharashtra news on the ncp road in pune
पुणे : भारतीय सैन्याला जगातील सर्वश्रेष्ठ सेना बनवण्यासाठी सीसीएअंतर्गंत एक निर्णय घेतला आहे. अग्निपथ योजनेअंतर्गंत तरुणांना अग्निवीर म्हणून सेवा करण्याची संधी मिळणार आहे. देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि देशातील युवकांना सैन्यात भरती करण्यांच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात येत आहे. असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केल्यापासूनच या योजनेला देशभरातून विरोध होताना दिसत आहे. याच पार्शवभूमीवर आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण दलातील भरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे संपुर्ण देशभर संतापाची भावना निर्माण झालेली आहे. अग्निपथ या फसव्या सैन्य भरती विरोधात आज हुतात्मा स्मारक सिल्वर जुबली येथे आंदोलन करण्यात आले. करुणा शर्मा-मुंडेंच्या अडचणी वाढल्या, पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा पुण्यातील महिलेचा आरोप
सत्तेत आल्यानंतर दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे भाजपा सरकारने कबूल केले होते. परंतू अशा ठेकेदार पद्धतीच्या भरतीच्या सैन्यात चार वर्षाची नोकरी देऊन सरळ-सरळ बेरोजगार तरुण तसेच देशाप्रती लढणाऱ्या जवानांचा हा आपमानच आहे याकरिता हे आंदोलन करण्यात आले आहे. असं प्रशांत जगताप यांनी यावेळी सांगितलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
अग्निपथ योजनेंतर्गत तरुणांना ४ वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाईल. त्यामुळे एका बाजूला सैनिकांच्या कमतरतेची समस्या कमी होईल. त्याचबरोबर सैनिकांवर होणारा खर्चही कमी होण्याची शक्यता आहे.