हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यातील टेंभूरदरा शिवारामध्ये एका महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. अहिल्याबाई खुडे (वय ७२) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील टेंभुरदरा शिवारामध्ये अहिल्याबाई व त्यांची सून शांताबाई या कुटुंबियासह आखाड्यावर राहतात. रविवारी सायंकाळच्या सुमारास किरकोळ कारणावरुन काहीजणांनी शांताबाई यांना मारहाण केली. त्यामुळे त्या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले.

असं उघडकीस आलं प्रकरण…

शेतातील आखाड्यावर अहिल्याबाई एकट्याच होत्या. आज सोमवारी सकाळी काही शेतकऱ्यांना अहिल्याबाई यांचा मृतदेह आखाड्याजवळ आढळून आला. त्यांच्या तोंडावर व डोक्यावर दगडाने वार केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील निकाळजे, जमादार चाटसे, प्रशांत शिंदे, वाखारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

भाजपला लक्ष्मणभाऊंपेक्षा चांगले नेते कुठून मिळणार? जगतापांच्या पक्षनिष्ठेने फडणवीस भारावले
पोलिसांचा सुरू आहे तपास…

अहिल्याबाई यांचा खून कोणत्या कारणामुळे झाला याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील आखाडा वरील शेतकऱ्यांचा जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. तर शांताबाई यांच्या माहितीनंतर नेमके खुनाचे काय कारण आहे याची माहिती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताचा शोध सुरू केला असून त्याच्या मागावर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. शेतीच्या कारणावरुन हा खून झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पुढचा मुख्यमंत्री प्रहारचा, हम बोलेंगे वैसेही सरकार चलेगी : बच्चू कडू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here