विवाहितेच्या शारीरीक आणि मानसिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण आठ जणांविरोधात गंगाखेड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

 

daughter in law complaints gangakhed police registered case against eight people
तुला मुलगा होत नाही, माहेरून २ लाख रुपये घेऊन ये… विवाहितेने असा दिला झटका
परभणी : माहेरून २ लाख रुपये घेऊन ये. तुला मुलगा होत नाही, या कारणावरुन सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारिरीक, मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय नागरगोजे, पार्वती नागरगोजे, धोंडिराम नागरगोजे, अर्जून नागरगोजे, शितल नागरगोजे, शोभा फड, वनिता मुंडे आणि उर्मिला मुंडे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.या प्रकरणी उर्मिला नागरगोजे या विवाहितेने तक्रार दिली आहे. उखळी बु. येथील दत्तात्रय नागरगोजे यांच्याशी २०१४ मध्ये उर्मिला यांचे लग्न झालेल होते. लग्नानंतर सुरवातीचे काही दिवस चांगले नांदविल्यावर सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ करण्यास सुरवात केली. या दरम्यान विवाहितेला दोन मुली झाल्या. त्यानंतर सासरच्या लोकांनी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये. तसेच तुला मुलगा का होत नाही? असे म्हणत विवाहितेला शिवीगाळ करुन शारिरीक व मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.या प्रकरणी विवाहितेने भरोसा सेलकडे तक्रार दिली. मात्र सासरच्या मंडळींच्या वागण्यात बदल झाला नाही. अखेर विवाहितेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दत्तात्रय नागरगोजे, पार्वती नागरगोजे, धोंडिराम नागरगोजे, अर्जून नागरगोजे, शितल नागरगोजे, शोभा फड, वनिता मुंडे, उर्मिला मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.सहाय्यक पोलीस अधीक्षकांना मिळाली गुप्त माहिती, बोगस ग्राहक पाठवले आणि हाती लागले…

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : daughter in law complaints gangakhed police registered case against eight people
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here