आरोग्य विभागाचे अधिकारी या १९१ पॉझिटिव्ह रुग्णांच्या करोना इतिहासाची पडताळणी करत आहेत. या लोकांपर्यंत करोना कसा पोहचला? याची चाचपणी सुरू आहे. जर हे लोक कुणाला भेटले नाहीत, कुठे गेले नाहीत, कोणताही परदेशाचा रेकॉर्ड नाही तर मग हे लोक करोनाबाधितांच्या यादीत आलेच कसे? असा प्रश्न अधिकाऱ्यांनाही पडलाय. उल्लेखनीय म्हणजे, शुक्रवारी एकाच दिवशी दिल्लीत ५६ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
त्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा अधिकारी नियमित स्वरुपात फोनवरून या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये कोविड-१९ चे लक्षण विकसित झाली आहेत का? याची तपासणी करत आहेत. संख्या मोठी नसली, तरी नियमित स्वरुपात आम्ही रुग्णांना आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना ट्रॅक करत आहोत. काही जण संपूर्ण माहिती देण्याची टाळाटाळ करतानाही आढळले आहेत तर काही जणांना गेल्या दोन आठवड्यांतील स्थानांचाही विसर पडलाय, असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
अनेक रुग्ण त्यांच्या नकळत करोना संक्रमित होत आहेत. आपण एखाद्या करोनाबाधिताच्या संपर्कात आलो आहोत, हे त्यांच्या ध्यानी-मनीही नसतं. मात्र, करोना चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळतात. परंतु, ही संख्या अधिक नाही, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गठीत केलेल्या पाच सदस्यीय कोविड १९ पॅनलचे प्रमुख डॉ. एस के सरीन यांनी म्हटलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times