मुंबई : बॉलिवूडमध्ये ९० च्या दशकामध्ये काही जोड्या खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. त्या जोड्या पडद्यावर जशा लोकप्रिय होत्या तशीच त्यांच्या ऑफस्क्रीन अफेअरचीही जोरदार चर्चा होती. त्यातच अजय देवगण आणि रवीना टंडन(Raveena Tandon) यांच्यातही अफेअर असल्याची जोरदार चर्चा होती. अजय आणि रवीना यांची जोडी ‘दिलवाले’ सिनेमामुळे खूपच हिट झाली होती. त्यांच्या ऑनस्क्रिनबरोबरच ऑफस्क्रिन अफेअरची जोरदार चर्चा होती.

हे दोघंजण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले अशी चर्चा होती. रवीना अजयच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली होती. रवीना आणि अजयनं त्यांच्या या अफेअरची कधीच जाहीर वाच्यता केली नाही. परंतु असं काही झालं त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला. अफेअरच्या बातम्यांमुळे अजय रवीनावर चांगलाच संतप्त झाला आणि तिची एका मुलाखतीमध्ये चांगलीच हजेरी घेतली. इतकंच नाही तर या मुलाखतीमध्ये त्यानं तिला ‘ ती नाटक करणारी आणि खोटारडी’ असल्याचं म्हटलं होतं.

अजय-रवीनानं एकमेकांवर केले आरोप

रवीना टंडन आणि अजय देवगण

Ajay Devgn आणि करिश्मा कपूर (Karisma Kapoor) यांच्या अफेअर सुरू होतं. रवीनाचं देखील अजयवर प्रेम होतं. परंतु करिश्माचं येणं तिला अजिबात आवडलं नव्हतं. तेव्हा नाराज झालेल्या रवीनानं एका मुलाखतीमध्ये दावा केला होता की, ती आणि अजय रिलेशनशिपमध्ये होती. इतकंच नाही तर अजयनं तिला अनेक लव्हलेटरही लिहिली होती. रवीनानं असं मुलाखतीत सांगितल्यावर अजय तिच्यावर खूपच भडकला आणि त्यानं रवीनाला खूप काही सुनावलं. अजयनं त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीची कॉपी सोशल मीडियावर आजही फिरत असते.

‘लव लेटर असतील तर ती जाऊन छाप’
रवीनाची ती मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर अजय तिच्यावर प्रचंड भडकला होता. त्यानं एका मुलाखतीमध्ये त्याचा राग व्यक्तही केला होता. त्यावेळी अजयनं रवीनाला सायकियाट्रिस्टची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं. अजयला जेव्हा त्यानं तिला लिहिलेल्या लव्हलेटरबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा तो म्हणाला,’पत्रं, कोणती पत्रं? त्या मुलीला सांगा जर तिच्याकडे ती पत्र असतील तर ती जाऊन छाप. मला देखील ती वाचायची आहेत. तिच्या डोक्यात नेमकं काय चाललं आहे हे मला देखील कळेल.’

तो पुढे म्हणाला,’आमच्या दोघांची कुटुंब एकमेकांची अनेक वर्षांपासून मित्र आहेत. माझी बहीण निलम हिची ती मैत्रीण आहे. त्यामुळे ती आमच्या घरी यायची. तेव्हा तिनं माझ्याशी वाईट वागायला सुरुवात केली. परंतु आम्ही तिला घराबाहेर काढू शकत नव्हतो. मी कधीही तिच्याशी जवळीक साधली नाही. तिला जरा विचार मी कधी तरी तिला फोन केला होता का किंवा कधी मी स्वतःहून तिच्याशी बोलायला गेलो. माझं नाव ती फक्त प्रसिद्धीसाठी वापरत आहे. तिनं आत्महत्येचा जो प्रयत्न केला होता, तो देखील पब्लिसिटी स्टंटच होता.’

रवीना खोटारडी आहे, तिच्या डोक्यावर इलाज करायला हवा

रवीना-अजय देवगण


अजयनं या मुलाखतीमध्ये रवीनाबरोबर त्याचं रिलेशन असल्याचं सपशेल नाकारलं. इतकंच नाही तर तुम्हा दोघांमध्ये नेमकं काय सुरू आहे. तुम्ही एकमेकांना माफ करून पुढे का नाही जात, असं विचारलं असता त्यानं सांगितलं की, माफी? असं विचारून तुम्ही मस्करी करत आहात. इथं प्रत्येकाला माहिती आहे की, अत्यंत खोटारडी आहे. तिच्या मूर्खासारख्या वक्तव्यांमुळे मला काहीच फरक पडत नाही. परंतु यावेळी मात्र तिनं साऱ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. मला तिला एक सल्ला द्यावासा वाटत आहे, तिनं स्वतःला एका चांगल्या मनोविकारतज्ज्ञाला दाखवायला हवे आणि तिच्या डोक्यावर इलाज करून घ्यायला हवा. नाही तर एक दिवस तिला वेड्यांच्या रुग्णालयात भरती करावं लागेल. तिला डॉक्टरकडे मी स्वतः घेऊन जाईन.’

दोघांच्या एकत्र फोटोवर अजय म्हणाला…
रवीना असं का वागते आहे, असा प्रश्न अजयला विचारला असता त्यानं सांगितलं की, ‘मला नाही माहितीय ती असं का वागते आहे. मी कधीही तिच्यात फार रस न दाखवल्यानं ती असं वागते आहे. मी तिच्या प्रेमात पडलो नाही, म्हणून ती असं वागते आहे…’ दोघांच्या एकत्र फोटोंवर अजयनं सांगितलं की, आमचे घरचे एकमेकांचे कौटुंबिक स्नेही आहेत. त्यामुळे एकमेकांच्या घरी होणाऱ्या कार्यक्रमांत आम्ही एकत्र सहभागी व्हायचो. त्यावेळी फोटो काढले जायचे. त्यातलेच हे फोटो आहेत. अर्थात त्या फोटोंमध्ये फक्त आम्हीच दोघं असायचो असं नाही. सिनेमासाठी प्रमोशनसाठी काढलेल्या फोटोंव्यतिरीक्त मी तिच्याबरोबर कधीच फोटो काढलेले नाहीत.

रवीना आणि मनीषाबरोबरचं अजयचं भांडण

अजय देवगण नायिकांबरोबर


अजयनं हे देखील सांगितलं होतं की, रवीना टंडन आणि मनीषा कोईराला या दोघींबरोबर तो कधीही काम करणार नाही. अजयनं रवीनाबरोबर दिलवाले व्यतिरीक्त एकही रास्ता, कयामत, गैर आणि दिव्य शक्ति हे सिनेमे केले होते. अजयच्या मते रवीना व्यतिरिक्त मनीषा कोईराला हिला देखील त्याच्यामुळे त्रास व्हायचा, तशा तक्रारी तिनं केल्या होत्या.

अर्थात बदलत्या काळानुसार अजय देवगण, रवीना टंडन त्यांच्या आयुष्यात खूप पुढे निघून आले आहेत. त्यानंतर या दोघांनी कोणत्याही सिनेमात एकत्र काम केलं नाही. रवीनानं अनिल थडानीशी लग्न केलं आणि ती तिच्या आयुष्यात सुखी आहे. तर अजय देखील काजोलच्या रुपात परफेक्ट लाईफ पार्टनर मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here