मुंबई : बॉलिवूडचा दंबग खान अर्थात सलमान खानच्या (Salman Khan) आगामी सिनेमाची त्याचे चाहते आतुरतेनं वाट बघत आहेत. हा सिनेमा आहे, ‘कभी ईद कभी दिवाली.’ गेल्या काही दिवसांपासून या सिनेमासंदर्भात सातत्यानं वेगवेगळ्या बातम्या येत असल्यानं त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आता पुन्हा एकदा या सिनेमाच्या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे सिनेमातील एका जबरदस्त गाण्यामध्ये सलमानबरोबर साऊथमधील एक सुपरस्टार झळकणार आहे. सिनेमासाठी आणि सिनेमातील या गाण्यासाठी सुपरस्टारनं होकारही दिला आहे.

सलमान खान

सलमान खान सध्या ‘कभी ईद कभी दिवाली’ (Kabhi Eid Kabhi Diwali) सिनेमाच्या चित्रीकरणासाठी हैदराबाद इथं आहे. त्याच्याबरोबर पूजा हेगड़े (Pooja Hedge), वेंकटेश (Venkatesh), जस्सी गिल (Jassie Gill), शहनाज गिल (Shehnaaz Gill), पलक तिवारी (Palak Tiwari), राघव जुयाल (Raghav Juyal) आणि सिद्धार्थ निगम (Siddharth Nigam) दिसणार आहेत. अलिकडेच आलेल्या बातमीनुसार राम चरण (Ram Charan) देखील या सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन फरहाद सामजी (Farhad Samji) करत आहे. यामुळे सलमान आणि राम चरणच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून ते आतुरतेनं सिनेमाची वाट बघत आहेत.

‘ती खोटारडी आहे,’ असं म्हणत अजय देवगणनं रवीना टंडनचा सर्वांसमोर केला होता अपमान

दरम्यान, Vikram Success Partyचं आयोजन चिरंजीवीनं केलं होतं त्यामध्ये कमल हासन, सलमान खान सहभागी झाले होते. एका न्यूज पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार सलमानच्या आगामी सिनेमात साऊथचा सुपरस्टार राम चरण एका खास गाण्यात दिसणार आहे. राम चरणनं देखील त्याला होकार दिला आहे. त्यामुळे हे गाणं आता जबरदस्त होणार यात शंका नाही. या गाण्यात सर्व फोकस हा राम चरण आणि सलमानवरच असणार आहे. त्यातून या दोघांमधील केमेस्ट्री त्यांच्या चाहत्यांना दिसणार आहे. रिपोर्ट्समध्ये असंही सांगितलं आहे की, वेंकटेश देखील या गाण्यात दिसण्याची शक्यता आहे. लवकरच निर्माते या संदर्भातील घोषणा करणार आहेत.

सलमान खान आणि राम चरण

दरम्यान, कभी ईद कभी दिवाली या सिनेमाचं नाव आता भाईजान असं बदलण्यात आलं आहे. खरं तर या सिनेमाचं मूळ नाव तेच होतं. हा सिनेमा या वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

रणबीरच्या शमशेरा लूकवर फिदा आलिया, पत्नीनं आपल्या पतीची अशी केली तारीफ

दरम्यान सलमान खानच्या आगामी कामाबद्दल सांगायचं तर त्याचा टायगर जिंदा है ३ आणि किक २ हे सिनेमे देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचप्रमाणं शाहरुख खानच्या पठाण सिनेमातही सलमाननं पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here