Vidhan Parishad Election 2022 | विधानपरिषद निवडणुकीच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार, हे आधीपासूनच ठरले होते. त्यामुळे दहाव्या जागेवरील उमेदवार निवडून आणण्यासाठी आमदारांची फोडाफोडी आणि घोडेबाजाराची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. आज सकाळी ९ वाजल्यापासून विधानभवनात मतदानाला सुरुवात झाली.

 

BJP 2 (1)

हायलाइट्स:

  • भाजपने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार दरेकर, खापरे, राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय यांना प्रत्येकी २६ मते मिळाली आहेत
  • भाजपला फक्त पाचव्या जागेच्या निकालाची प्रतिक्षा आहे
  • विधानपरिषदेच्या पाचव्या जागेसाठी प्रसाद लाड रिंगणात आहेत
मुंबई: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला आहे. यामध्ये भाजपचे चारही उमेदवार पहिल्याच फटक्यात विजयी झाले आहेत. भाजपचे प्रविण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि राम शिंदे हे पहिल्याच पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून आले. भाजपने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार दरेकर, खापरे, राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय यांना मते मिळाली आहेत. श्रीकांत भारतीय आणि प्रविण दरेकर यांना प्रत्येकी ३० आणि राम शिंदे यांना २९ आणि उमा खापरे यांना पहिल्या पसंतीची २६ मते मिळाली आहेत. त्यामुळे आता भाजपला फक्त पाचव्या जागेच्या निकालाची प्रतिक्षा आहे. विधानपरिषदेच्या पाचव्या जागेसाठी प्रसाद लाड रिंगणात आहेत. ही जागा जिंकण्यासाठी भाजपकडे पुरेशी मतं नसल्याने या जागेचा निकाल काय लागणार, हे पाहावे लागेल. (Vidhan Parishad Election 2022)
एकनाथ खडसे यांचा वनवास संपला, ३ वर्षानंतर पुन्हा विधिमंडळात आवाज घुमणार!
विधानपरिषद निवडणुकीच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार, हे आधीपासूनच ठरले होते. त्यामुळे दहाव्या जागेवरील उमेदवार निवडून आणण्यासाठी आमदारांची फोडाफोडी आणि घोडेबाजाराची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. आज सकाळी ९ वाजल्यापासून विधानभवनात मतदानाला सुरुवात झाली. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच भाजपचे आमदार सर्वप्रथम मतदानासाठी विधानभवनात पोहोचले. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार टप्याटप्प्याने विधानभवनात मतदानासाठी येत होते. शिवसेनेचे आमदार सर्वात शेवटी मतदानासाठी विधानभवनात दाखल झाले. दुपारी चार वाजेपर्यंत एकूण २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी विधानपरिषदेत मतदान करता यावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने मतदान संपायला काही क्षण बाकी असताना मलिक आणि देशमुख यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मतं कमी झाली होती. मात्र, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर हे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : mlc election vidhan parishad election 2022 bjp pravin darekar uma khapre ram shinde and shrikant bhartiya won
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here