Vidhan Parisahd Election 2022 | भाजपचे चारही उमेदवार पहिल्या फटक्यात विजयी झाले आहेत. भाजपचे प्रविण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि राम शिंदे हे पहिल्याच पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून आले. यापैकी श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे यांना प्रत्येकी ३० मतं मिळाली. तर प्रविण दरेकर यांना २९ मते मिळाली आणि उमा खापरे या २६ मतांचा कोटा पूर्ण करून विजयी झाल्या.

हायलाइट्स:
- शिवसेनेच्या एकूण ५५ मतांच्या कोट्यांपैकी फक्त ५२ मते त्यांना मिळाली आहेत
- शिवसेनेची तीन मतं फुटल्याचे सांगितले जात आहे
- काँग्रेसकडे एकूण ४४ आमदार होते
प्राथमिक माहितीनुसार, शिवसेनेच्या एकूण ५५ मतांच्या कोट्यांपैकी फक्त ५२ मते त्यांना मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेची तीन मतं फुटल्याचे सांगितले जात आहे. तर काँग्रेसकडे एकूण ४४ आमदार होते. मात्र, काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना मिळून एकूण ४१ मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचीही तीन मतं फुटल्याचे निष्पन्न झाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान न करता आल्यामुळे त्यांच्याकडे ५१ इतके संख्याबळ होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्षांच्या साथीने ५७ मतांची बेगमी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे सहजपणे निवडून आले.
तर दुसरीकडे भाजपचे चारही उमेदवार पहिल्या फटक्यात विजयी झाले आहेत. भाजपचे प्रविण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि राम शिंदे हे पहिल्याच पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून आले. यापैकी श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे यांना प्रत्येकी ३० मतं मिळाली. तर प्रविण दरेकर यांना २९ मते मिळाली आणि उमा खापरे या २६ मतांचा कोटा पूर्ण करून विजयी झाल्या. तर काँग्रेसचे गोटात अजूनही धाकधुक आहे. कारण, काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप हे दोन्ही उमेदवारांपैकी अद्याप एकही जण विजयी झालेला नाही. प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची १७ तर भाई जगताप यांना १९ मते मिळाली आहेत. त्यामुळे या लढतीचा निकाल दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे लागणार आहे. यामध्ये भाजपच्या प्रसाद लाड यांची सरशी होईल, असा दावा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : vidhan parisahd election 2022 mlc election bjp snatches mva govt 20 votes
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network