मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत आमचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. आम्ही राज्यसभेला १२३ मतं मिळवली होती. आता आम्ही १३४ मतं मिळवली आहेत. महाविकास आघाडीवर आमदार नाराज आहेत. पाचव्या उमेदवारासाठी एकही मत नव्हतं. तरीही आमचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड विजयी झाले, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीला अस्मान दाखवल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही फडणवीसांनी करिश्मा करुन दाखवला. महाविकास आघाडीच्या मतांना त्यांनी अक्षरश: सुरुंग लावला. राज्यसभेत फडणवीसांनी मविआची १० मतं फोडली होती. यावेळी त्यांनी मविआची २१ मतं फोडून आघाडीला सर्वोच्च धक्का दिला. भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. विजयानंतर भाजपने दणक्यात सेलिब्रेशन केलं. दिवसभर विधिमंडळात ठाण मांडून बसलेल्या फडणवीसांनी विजयी उमेदवारांची घोषणा होताच विधिमंडळाबाहेर येऊन पत्रकारांशी संवाद साधला. ही परिवर्तनाची सुरुवात आहे, जोपर्यंत महाराष्ट्रात लोकाभिमुख सरकार येत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरु राहील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विधानपरिषद निकाल : फडणवीसांचा करिष्मा, ठाकरे सरकारला धक्का, भाजप पाचही जागांवर विजयी
“आमचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. आम्ही राज्यसभेला १२३ मतं मिळवली होती. आता आम्ही १३४ मतं मिळवली आहेत. महाविकास आघाडीवर आमदार नाराज आहेत. पाचव्या उमेदवारासाठी एकही मत नव्हतं. तरीही आमचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड विजयी झाले. आमचे सहकारी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक अत्यंत अडचणी असून देखील ते इथं आले आणि विजयाला हातभार लावला”.

MLC Election: भाजपचे चारही उमेदवार पहिल्याच फटक्यात विजयी
“महाविकास आघाडी सरकार विरोधात आमचा संघर्ष सुरुच राहील. लोकाभिमुख सरकार आणत नाही तोपर्यंत आम्ही लढू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशात मोदींची लाट आहे. महाराष्ट्र देखील मोदींच्या पाठिशी आहे”

“चमत्कार वगैरे मी मानत नाही, असंतोष मतांमध्ये परावर्तित झालेला आहे. असंतोष वाढत राहिला तर काय होईल, याचा विचार करावा. पक्षांच्या आमदारांचं आणि अपक्ष आमदारांचं आभार मानतो. आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही आमचा संघर्ष जनतेसाठी आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एकनाथ खडसे यांचा वनवास संपला, ३ वर्षानंतर पुन्हा विधिमंडळात आवाज घुमणार!
भाजपच्या पाचही उमेदवारांनी विजयी गुलाल उधळला

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित दहा जागांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमश्या पाडवी, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर, भाजपचे उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रवीण दरेकर हे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेस उमेदवार भाई जगताप आणि भाजप उमेदवार प्रसाद लाड यांच्यात दहाव्या जागेसाठी कांटे की टक्कर मानली जात होती. मात्र निकालाला अनपेक्षित कलाटणी मिळाली आणि सेफ मानले जाणारे काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले. तर भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसच्या भाई जगताप या दोघांनीही विजयाचा गुलाल उधळला. या निकालामुळे राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेवरही पुरेसे संख्याबळ नसताना भाजपने विजय मिळवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here