महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे १३ आमदार आहेत. शिंदे यांचा मुक्काम सध्या गुजरातमध्ये आहे.

हायलाइट्स:
- राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप
- एकनाथ शिंदे सेना आमदारांसह गुजरातमध्ये
- भाजपच्या नेत्यांनी घेतली शिंदेंची भेट
विधान परिषदेच्या निवडणुकीत पहिल्या पसंतीची १३४ मतं मिळवत भाजपनं एकच खळबळ उडवून दिली. शिवसेना, काँग्रेसची मतं फुटली. यानंतर आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे तब्बल १३ आमदार नॉट रिचेबल आहेत. विधानपरिषद निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर सोमवारी सायंकाळपासून शिवसेनेचे नाराज आमदार गायब आहेत. पक्षाकडून त्यांना संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र अजूनही हे आमदार मुंबईतील कोणत्याही शिवसेना नेत्याच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे नाराज आमदार सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बॅरिकेडिंग उभारण्यात आलं आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भेट घेतल्याचं समजतं. शिंदे आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यामध्ये मतभेद असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. आता त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.
हॉटेल मेरिडियनमध्ये चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. यानंतर पाटील हॉटेलमधून निघाले आणि अहमदाबादच्या दिशेनं रवाना झाले. एकनाथ शिंदे यांच्या गुजरात मुक्कामाची माहिती पुढे आल्यानंतर राजकीय क्षेत्रात वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. सूरतमधून लवकरच शिवसेनेच्या आमदारांना दक्षिण गुजरातमधील अज्ञात स्थळी हलवण्यात नेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : bjp gujarat president chandrakant patil meets shiv sena leader eknath shinde
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network