सातारा : साताऱ्यामध्ये वारकऱ्यांच्या ट्रकला भीषण अपघात झाला असून या अपघातात एका वारकाऱ्याचा मृत्यू झाला आहे तर चार वारकरी जखमी झाले आहेत. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

खरंतर, तीन दिवसांत साताऱ्याच्या हद्दीत वारकऱ्यांच्या गाडीला झालेला हा दुसरा अपघात आहे. अपघातातील सर्व वारकरी सांगली जिल्ह्यातील असून सांगलीहून आळंदीला जाताना हा अपघात झाला आहे. पहाटेच्या सुमारास साताऱ्यातील रायगाव गावच्या हद्दीत ट्रक आला असता ट्रकचा टायर अचानक फुटला. यामुळे चालकानं ट्रकचं स्पीड कमी केला पण तितक्यात ट्रकला मागुन आयशर टेम्पोने धडक दिल

एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे किती आणि कोणते आमदार नॉट रिचेबल, कुठे मुक्काम आणि पुढे काय?

यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत असून वारकऱ्यांच्या गाडीला हा सलग दुसरा अपघात झाला आहे.

‘माझ्याशी बोलली नाहीस तर अंकितासारखे ठार करेन’, भर रस्त्यात तरुणीला दिलेल्या धमकीने खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here