दरम्यान, एकनाथ शिंदे हे पुन्हा पक्षासोबत येतील, असा विश्वास शिवसेना नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत असला तरी शिंदे यांनी थेट भाजप नेत्यांसोबत चर्चा केल्याने आगामी काळात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्यावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल २० हून अधिक आमदार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाकरे सरकारसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे.
Home Maharashtra एकनाथ शिंदे शिवसेना: ‘एकनाथ शिंदे थोड्याच वेळात शिवसेनेच्या संपर्कात असतील’; पक्षाकडून पहिली...
एकनाथ शिंदे शिवसेना: ‘एकनाथ शिंदे थोड्याच वेळात शिवसेनेच्या संपर्कात असतील’; पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया – the first reaction came from shiv sena after eknath shinde went to surat with party mlas
मुंबई : शिवसेनेचे दिग्गज नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. शिवसेनेतील नाराज आमदारांसह एकनाथ शिंदे हे थेट गुजरातमध्ये निघून गेले आहेत. गुजरातमधील ज्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे मुक्कामाला आहेत, तिथे गुजरात भाजपमधील काही नेत्यांशी त्यांची चर्चा झाल्याचीही माहिती आहे. शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार हे मंत्रीही शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शिवसेना फुटणार असल्याची चर्चा जोर धरू लागली असून पक्षात खळबळ उडाली आहे. या सगळ्या घडामोडींबाबत शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया आली असून पक्षाच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबत भाष्य केलं आहे.