एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार १५- १९ आमदार सध्या गुजरातमध्ये आहेत. सूरतमधील मेरिजियन हॉटेलमध्ये ते असून हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, सूरत येथे चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चंद्रकांत पाटील हे काल गांधीनगरयेथील पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला होते. मात्र, हा कार्यक्रम सोडून पाटील अचानक सूरतला गेले. तिथेच शिंदे आणि त्यांची भेट झाली. त्यामुळं शिंदे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. अशातच नॉट रिचेबल असलेल्या एकनाथ शिंदे यांनी योगा दिनानिमित्त एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये असलेल्या कमळाच्या चित्रामुळं तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
वाचाः शिवसेनेची धाकधूक वाढली, एकनाथ शिंदे गुजरातमधून घेणार पत्रकार परिषद; मोठ्या निर्णयाची शक्यता
एकनाथ शिंदे यांनी काही तासांपूर्वी एक फेसबुक पोस्ट करत योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. योगा म्हणजे संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृद्धी जीवनाचा राजमार्ग, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्री आपल्या पोस्टसोबत असलेल्या फोटोत मागे कमळाचे चित्र आहे. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे खरंच बंड पुकारणार का?, अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांची फेसबुक पोस्ट
शिवसेनेने बोलावली बैठक
विधानपरिषद निवडणुकांचे मतदान पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री १२.३० वाजता वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक घेतली होती. मात्र, या बैठकीसाठी शिवसेनेचे १३ आमदार गैरहजर होते. पक्षाकडून या आमदारांना वारंवार संपर्क करण्यात येत होता. त्यानंतर आज सकाळी पुन्हा आमदारांना बोलावणं धाडलं आहे. या बैठकीला तरी आमदार उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असण्याने शिवसेनेतील अंतर्गंत कलह चव्हाट्यावर आला असल्याची चर्चा सुरू आहे.
वाचाः Big breaking: ठाकरे सरकार मोठ्या संकटात; शिवसेनेचे आणखी नऊ आमदार सुरतसाठी रवाना