Eknath Shinde vs Sanjay Raut | महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेश आणि राजस्थान पॅटर्न राबवण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, महाराष्ट्रात हा पॅटर्न चालणार नाही. तुम्हाला या पद्धतीने किंगमेकर होता येणार नाही, या पद्धतीने सरकार अस्थिर करता येणार नाही. शिवसेनेत आईचं दूध विकणारी औलाद निर्माण होणार नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले

हायलाइट्स:
- शिवसेनेत भूकंप होणार, असे जे काही चित्र रंगवले जात आहे, त्यामध्ये तथ्य नाही
- गुजरातमध्ये असलेल्या काही आमदारांशी आमचा संपर्क झाला आहे
- शिंदेसोबत गेले म्हणून सांगण्यात येत असलेले शिवसेनेचे अनेक आमदार मातोश्रीवर दाखल झाले आहेत
यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाल्याचे सांगितले. पण शिंदे यांच्या भूमिकेविषयी राऊत यांनी मौन बाळगले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये असलेल्या काही आमदारांना दिशाभूल करून त्याठिकाणी नेण्यात आल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला. शिवसेनेत भूकंप होणार, असे जे काही चित्र रंगवले जात आहे, त्यामध्ये तथ्य नसल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये असलेल्या काही आमदारांशी आमचा संपर्क झाला आहे. तसेच शिंदेसोबत गेले म्हणून सांगण्यात येत असलेले शिवसेनेचे अनेक आमदार मातोश्रीवर दाखल झाले आहेत. यामध्ये प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांचा समावेश असल्याचे राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचेही स्पष्ट केले. आता आम्ही वर्षा बंगल्यावर बैठकीसाठी जात आहोत. काही गोष्टी निश्चितच संशयास्पद आहेत. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेश आणि राजस्थान पॅटर्न राबवण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, महाराष्ट्रात हा पॅटर्न चालणार नाही. तुम्हाला या पद्धतीने किंगमेकर होता येणार नाही, या पद्धतीने सरकार अस्थिर करता येणार नाही. शिवसेनेत आईचं दूध विकणारी औलाद निर्माण होणार नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : shivsena leader sanjay raut warns eknath shinde after vidhanparisahd election 2022
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network