मुंबईः विधानपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या नॉट रिचेबल असून बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे २२ आमदार आहे. गुजरातमधील सूरत येथील हॉटेलमध्ये हे सर्व आमदार असून या आमदारांचे एकनाथ शिंदेंना समर्थन दिलं आहे. (list of mla shiv sena mla)

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार २५- २९ आमदार सध्या गुजरातमध्ये आहेत. सूरतमधील मेरिजियन हॉटेलमध्ये ते असून हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, सूरत येथे चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे सर्व आमदार बंड करणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील हे काल गांधीनगरयेथील पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला होते. मात्र, हा कार्यक्रम सोडून पाटील अचानक सूरतला गेले. तिथे त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे. त्यामुळं शिंदे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

सुरतला पोहचलेल्या शिवसेना आमदारांची यादी

१. एकनाथ शिंदे – कोपरी
२. अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद
३. शंभुराज देसाई – पाटण, साताराट
४. संदिपान भुमरे – पैठण, औरंगाबाद
५. उदयसिंह राजपूत – कन्नड, औरंगाबाद
६. भरत गोगावले – महाड, रायगड
७. नितीन देशमुख – बाळापूर, अकोला
८.अनिल बाबर – खानापूर-आटपाडी, सांगली
९.विश्ननाथ भोईर – कल्याण पश्चिम

१०. संजय गायकवाड – बुलडाणा
११. संजय रायमूलकर – मेहकर
१२. महेश शिंदे – कोरेगाव, सातारा
१३. शहाजी पाटील – सांगोला, सोलापूर
१४. प्रकाश आबिटकर – राधानगरी, कोल्हापूर
१५ संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ

१६. ज्ञानराज चौगुले – उमरगा, उस्मानाबाद
१७. तानाजी सावंत – परांडा, उस्मानाबाद

१८. संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम
१९. रमेश बोरनारे – वैजापूर, औरंगाबाद
२०. श्रीनिवास वनगा, पालघर
२१. राजकुमार पटेल, अपक्ष
२२. प्रदीप जैस्वाल, अपक्ष

‘या’ आमदारांची नावेही चर्चेत

शांताराम मोरे, भिवंडी ग्रामीण
चिमणराव पाटील,
बालाजी किणीकर, अंबरनाथ

शिवसेनेच्या आमदारांची यादी

शिवसेनेच्या आमदारांची यादी

8 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here