शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आहेत. ते गुजरातच्या सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे एकूण २१ आमदार आहेत. यामुळे शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे.

 

eknath shinde
शिवसेना नेते एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • एकनाथ शिंदे २१ सेना आमदारांसह गुजरातमध्ये
  • एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज
  • नॉट रिचेबल शिंदेंमुळे सेनेचं टेन्शन वाढलं
मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार विजयी झाल्यानंतर आता महाविकास आघाडीला हादरे बसू लागले आहेत. राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं सर्व उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. अवघ्या दोन आठवड्यांमध्ये भाजपनं मविआला दोन मोठे दणके दिले आहेत. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. यानंतर आता शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २१ आमदार नॉट रिचेबल आहेत. ते सध्या गुजरातच्या सूरतमध्ये वास्तव्याला आहेत.

आम्ही शिवसैनिकच आहोत, आम्ही शिवसेनेतच आहोत, अशी भूमिका शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतच सरकार आम्हाला मान्य नाही. या दोन पक्षांसोबतचा घरोबा आम्हाला नको, अशी थेट भूमिका त्यांनी घेतली आहे. शिवसेनेनं अडीच वर्षांपूर्वा भाजपची साथ सोडत काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात धरला. तो निर्णय सेनेच्या काही आमदारांना पटला नव्हता. या आमदारांची नाराजी आता उफाळून आली आहे.
Devendra Bhuyar: शिवसेनेच्या गोटात भूकंप, अजित पवारांच्या समर्थकांना लागले दादांच्या मुख्यमंत्रीपदाचे वेध
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबत स्थापन केलेल्या सरकारमध्ये शिवसेनेला म्हणावं तितकं महत्त्व मिळत नाही. अनेक महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे शिवसेना आमदारांना, मंत्र्यांना पुरेसा निधी मिळत नाही. बराचसा निधी राष्ट्रवादीलाच मिळतो, अशी भूमिका सेनेच्या नाराज आमदारांची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत अडीच वर्षे सत्तेत आहोत. झाला तितका संसार पुरे झाला. त्यांच्यासोबत आणखी घरोबा नको, असा पवित्रा सेनेच्या आमदारांनी घेतला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : dont want government with congress and ncp says shiv sena mlas who are with eknath shinde
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here