MP Prataprao Jadhav  : महाविकास आघाडीतील जेष्ठ मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे बंडाच्या पवित्र्यात आहेत. 25 आमदारांना घेऊन शिंदे हे गुजरातमधील सुरतला घेऊन गेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रात राजकीय भूंकप होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. राज्यात एकिकडं  एवढ्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडं शिवसेना खासदार प्रतापराव जाधव हे आपल्या शेतात ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना दिसले. मात्र, राज्यातील घडामोडींची माहिती मिळताच जाधव थेट मुंबईकडे रवाना झाले आहेत. 

दरम्यान, या सर्व प्रकारावर बोलण्यास शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी बोलण्यास नकार दिला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे 25 शिवसेना आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे.

नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. कालच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि गट नॉट रिचेबल आहेत. महत्त्वाची माहिती म्हणजे, काल एकनाथ शिंदे आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठकही पार पडल्याची माहिची मिळत आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अशातच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून या भूकंपाचं केंद्र गुजरात तर नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवसेनेच्या काही आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न एबीपी माझाकडून करण्यात आला. परंतु, काही आमदारांचे फोन नॉट रिचेबल लागले आहेत. एबीपी माझाच्या हाती काही आमदारांची यादी लागली आहे. हेच आमदार एकनाथ शिंदेंसोबत गुजरातमध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here