Shivsena Eknath Shinde | शिंदे यांच्यासोबत जाऊ शकणारे तीन आमदार सेंट रेगिसमध्ये असल्याचे समजताच शिवसैनिक आणि काही आमदार तातडीने याठिकाणी दाखल झाले. त्यानंतर आमदार सुनील शिंदे यांनी या तिन्ही आमदारांना आपल्या गाडीत बसवले. या गाडीच्या अवतीभवती सचिन अहिर आणि सुनील प्रभू यांच्या गाड्या होत्या. अशा कडेकोट बंदोबस्तामध्ये या तिन्ही आमदारांना वर्षा बंगल्यावरील बैठकीसाठी नेण्यात आले.

 

Shinde supporter MlA
शिवसेनेच्या गोटात नाराजी

हायलाइट्स:

  • हे सर्व आमदार सकाळपासून नॉट रिचेबल होते
  • हे सर्वजण सुरतला जाऊन एकनाथ शिंदे यांना भेटणार होते
  • शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी वेगाने सूत्रे हलवायला सुरुवात केली
मुंबई:एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह थेट सूरत गाठून भाजपशी वाटाघाटी सुरु केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांचा मुक्काम सध्या सूरत येथील मेरिडियन हॉटेल आहे. याठिकाणी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास १३ आमदार उपस्थित असल्याची माहिती आहे. तर आणखी काही आमदार मुंबईतून सुरतला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या असून सध्या या आमदारांना मुंबईतच रोखून धरले जात आहे. (Shivsena leader Eknath Shinde in Gujrat)

एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील राजकीय वजन आणि आमदारांशी असलेले संबंध पाहतात ते पक्षातील एक मोठा गट फोडू शकतात. एकनाथ शिंदे सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या गटातील शिवसेना आमदार सूरतला जाण्याच्या तयारीत होते. यामध्ये दादा भुसे, संजय राठोड, संतोष बांगर आणि अंबादास दानवे यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. हे सर्वजण सुरतला जाऊन एकनाथ शिंदे यांना भेटणार होते. हे सर्व आमदार सकाळपासून नॉट रिचेबल होते. मात्र, यापैकी काही आमदार मुंबईतील सेंट रेगिस हॉटेलमध्ये मुक्कामाला असल्याची माहिती शिवसेनेला लागली. त्यानंतर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी वेगाने सूत्रे हलवायला सुरुवात केली.
एकनाथ शिंदेंसोबतच्या सर्व आमदारांची यादी ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे; वाचा कोण आहेत ते २२ आमदार
शिंदे यांच्यासोबत जाऊ शकणारे तीन आमदार सेंट रेगिसमध्ये असल्याचे समजताच शिवसैनिक आणि काही आमदार तातडीने याठिकाणी दाखल झाले. त्यानंतर आमदार सुनील शिंदे यांनी या तिन्ही आमदारांना आपल्या गाडीत बसवले. या गाडीच्या अवतीभवती सचिन अहिर आणि सुनील प्रभू यांच्या गाड्या होत्या. अशा कडेकोट बंदोबस्तामध्ये या तिन्ही आमदारांना वर्षा बंगल्यावरील बैठकीसाठी नेण्यात आले. यापूर्वी २०१९च्या सत्तानाट्यावेळीही शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना हुडकून काढण्याची भूमिका चोखपणे पार पडली होती. आतादेखील एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाऊ शकणाऱ्या आमदारांना रोखण्यासाठी शिवसेनेकडून वेगवान हालचाली सुरु आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivsena pick up dada bhuse sanjay rathod form mumbai hotel who may go with eknath shinde
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here