eknath shinde: Eknath Shinde Tweet : आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, एकनाथ शिंदेंचं बंडानंतर पहिलं ट्विट – maharashtra political crisis eknash shinde first tweet after reach at surat with 20 mlas
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा उल्लेख करणारं ट्विट केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपनं यश मिळवल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारपुढं राजकीय संकट निर्माण आहे. शिवसेनेचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या नॉट रिचेबल असून बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे २२ आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं असून “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.