मुबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या नावाने आज महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. याच नावामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi) संकटाचे ढग आहेत. एकनाथ शिंदे १३ आमदारांसह गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांनी घाईघाईने आमदारांची तातडीची बैठक बोलावली, तर मित्रपक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनीही सर्व आमदारांना बोलावले आहे. दुसरीकडे तिसरा सर्वात मोठा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने आपल्या आमदारांना दिल्लीत बोलावले आहे. महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणणारे एकनाथ शिंदे कोण आहेत ते जाणून घेऊया.

ठाकरे घराण्यानंतर सर्वात बलवान शिवसैनिक

एकनाथ शिंदे हे ठाकरे घराण्यानंतर सर्वात शक्तिशाली शिवसैनिक असल्याचे बोलले जाते. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याचे मान्य केले नसते तर आज एकनाथ शिंदे त्याच खुर्चीत असते, अशीही चर्चा होती. ५९ वर्षांचे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र सरकारचे नगरविकास मंत्री आहेत. १९८० मध्ये त्यांनी शाखाप्रमुख म्हणून शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे हे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले आहेत. पक्षासाठी ते तुरुंगातही गेले आहेत. कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिक अशी त्यांची प्रतिमा आहे.

एकनाथ शिंदेंच्या टीममधील प्रत्येक आमदाराची इत्यंभूत माहिती; कोण आणि का आहेत शिंदेंसोबत?
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पहाडी जावळी तालुक्यातील आहेत. ठाणे शहरात गेल्यानंतर त्यांनी मंगला हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे येथे ११वीपर्यंत शिक्षण घेतले. ठाण्यात शिंदे यांचा प्रभाव असा आहे की लोकसभा निवडणूक असो की नागरी निवडणूक, त्यांचा उमेदवार नेहमीच जिंकतो. एकनाथ यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हेही शिवसेनेच्या तिकिटावर कल्याणमधून खासदार आहेत. ऑक्टोबर २०१४ ते डिसेंबर २०१४ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. २०१४ मध्येच महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये PWD चे कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती तर २०१९ मध्ये सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण (महाराष्ट्र सरकार) कॅबिनेट मंत्री पद मिळाले.

राजकीय भूकंप घडत असताना ठाकरे सरकारच्या यंत्रणेकडून मोठी चूक? महत्त्वाची माहिती उघड
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता होता राहिले…

२०१९ मध्ये शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय होत नव्हता. निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव यांनी एकनाथ शिंदे यांची विधानसभेतील विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. तेव्हा शिंदे यांना मुख्यमंत्री केले जाईल असे वाटले होते. पण शरद पवार आणि सोनिया गांधी यांना उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावे असे वाटत होते. मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी उद्धव यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव होता. त्यामुळे यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता होता राहिले.

एकनाथ शिंदेंकडे आहेत फक्त चार पर्याय; पाहा महाराष्ट्राच्या राजकारणात काय होऊ शकते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here