मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणात सध्या वादळ आलं आहे. विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलतेय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेचे निष्ठावंत नेते अशी ओळख असलेले सध्या चर्चेत आहेत. पक्षावर नाराज असलेले शिंदे सध्या नॉट रिचेबल आहेत. पण ही काही पहिली वेळ नाही, की शिंदे नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या आयुष्यातील एक असा काळा दिवस होता. त्यामुळं त्यांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. त्यानंतर ते बरेच दिवस कोणाच्याही संपर्कात नव्हते. तो दिवस होता त्यांच्या दोन मुलांचा अपघाती मृत्यू.

गेल्या महिन्यात शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित जीवनपट ‘’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात दिघेंच्या आयु्ष्यातील महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. दिघे यांचे शिष्य म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना चित्रपटात दाखवण्यात आल्या. शिंदे यांच्या आयुष्यात एक मोठी दु:खद घटना घडली. त्यानंतर दिघे यांनी शिंदेंना दु:खातून बाहेर काढलं.

काय आहे नेमका तो प्रसंगएकनाथ शिंदे यांची दोन मुलं बोटिंग करण्यासाठी म्हणून गेली होती. पण त्यावेळी एक दुर्घटना घडली आणि त्यात दोन्हीही मुलांचा मृत्यू झाला. त्यावेळी शिंदेंचा मोठा मुलगा श्रीकांत हा फक्त १४ वर्षांचा होता. २ जून २००० मध्ये ही घटना घडली. त्यानंतर एकनाथ शिंदे अनेक दिवस कोणाच्याही संपर्कात नव्हते. त्यांच्या पाठिशी उभे राहिले. त्यांना धीर दिला, यातून बाहेर पडण्याचं बळ दिलं.

154 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here