शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आहेत. ते गुजरातच्या सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे एकूण २१ आमदार आहेत. यामुळे शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे.

हायलाइट्स:
- एकनाथ शिंदे २१ सेना आमदारांसह गुजरातमध्ये
- एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज
- नॉट रिचेबल शिंदेंमुळे सेनेचं टेन्शन वाढलं
काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा नको. झाला तितका संसार पुरे झाला, अशी शिंदे आणि समर्थक आमदारांची भूमिका आहे. शिंदे यांच्या बंडामागे भाजप असल्याचं बोललं जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत असताना भाजप आमदार संजय कुटे गुजरातच्या सूरतमध्ये पोहोचले आहेत.
सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा मुक्काम आहे. त्यांच्या भेटीसाठी कुटे पोहोचले. त्यांची पांढऱ्या रंगाची कार हॉटेलबाहेर असलेल्या पोलिसांनी अडवली. यानंतर फोनाफोनी झाली. पोलिसांनी कुटे यांची चौकशी केली. त्यांच्याकडून माहिती घेतली. यानंतर कुटेंची कार आतमध्ये सोडण्यात आली.
संजय कुटे हे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन हॉटेल मेरिडियनमध्ये गेल्याची चर्चा आहे. भाजप नेते भूपेंद्र यादव आणि मंगलप्रभात लोढा हे संपूर्ण ऑपरेशन हाताळत असल्याची माहिती आहे. त्यांनी सूरतमधील एक फार्म हाऊसदेखील बूक केलं आहे. शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना त्या फार्म हाऊसवर हलवण्यात येऊ शकतं.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : bjp leader sanjay kute reaches gujarat hotel where shiv sena leader eknath shinde and his supporter mlas are staying
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network