सांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील ९ जणांच्या सामूहिक आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. कर्जबाजारीपणा आणि सावकारीच्या जाचाला कंटाळून वनमोरे कुटुंबाने आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी आता पर्यंत २५ जणांविरोधात गुन्हे दाखल करत १३ सावकारांना अटक केलं असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशाला हादरवून सोडणारी घटना मिरज तालुक्यातील म्हैसाळ या ठिकाणी घडली आहे. तब्बल ९ जणांच्या परिवाराने एकाच वेळी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. येथील पशुवैद्यकीय डॉक्टर असणारे माणिक वनमोरे व त्यांचे शिक्षक बंधू पोपट वनमोरे, या दोघांनी आपली आपल्या आई, पत्नी व मुलांच्या समवेत सामूहिक आत्महत्या केल्याने एकाच खळबळ उडाली आहे. दोन्ही कुटुंबांनी आपल्या घरामध्ये एकाच वेळी विष पिऊन हे आत्महत्या केली आहे. घटनास्थळाची परिस्थिती पाहिल्यानंतर अनेकांकडून अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत होते. नेमकी आत्महत्या कोणत्या कारणाने झाली, हा घातपात आहे, की नेमकी आत्महत्या की आणखी काय आहे? याबाबत अनेक तर्कवितर्क देखील व्यक्त करण्यात येत होते. वनमोरे बंधूंवर कोट्यवधी रुपयांचं कर्ज झाले होते. या कर्जाच्या वसुलीचा तगादा आणि सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं. त्याचबरोबर गुप्तधनाच्या लालसेपोटी कुटुंबाने पैसे एक मांत्रिकावर लुटवले होते. त्यातून कंगाल होऊन कर्ज झालं होतं.

फडणवीसांचे खास दूत शिंदेंच्या भेटीसाठी सूरतमध्ये; फोनाफोनीनंतर हॉटेलमध्ये एंट्री
मांत्रिकाकडून ‘नासा’ या वैज्ञानिक सेंटरला काही चमत्कारिक वस्तू पाठवल्या तर कोट्यवधी रुपये मिळतात असे सांगत ते शोधण्यासाठी वनमोरे बंधूनी मांत्रिकाच्या माध्यमातून पैसे खर्च केल्याची चर्चा गावात सुरु होती. तसेच आत्महत्येच्या दिवशी माणिक वनमोरे यांनी गावातील एका किराणा दुकानातून २० नारळ खरेदी केली होती. अशा अनेक गोष्टींची चर्चा सुरू होती. त्यामुळे पोलिसांच्या समोर देखील या घटनेचा उलगडा कसा करायचा याचं देखील मोठं आव्हान निर्माण झालं होतं. मात्र, माणिक आणि पोपट वनमोरे यांच्या खिशात एक चिट्टी सापडली होती. ज्यामध्ये काही व्यक्तींची नाव आणि सांकेतिक आकडे होते. तसेच उद्योगासाठी कर्ज असल्याचा उल्लेख चिट्ठीमध्ये होता. त्याआधारे पोलिसांनी गतीने तपास करून आत्महत्येचा उलगडा केला आहे.

सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषद घेऊन कुटुंबीयांच्या आत्महत्येमागच्या कारणांचा खुलासा केला आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे यांनी उद्योगासाठी व्याजावर अनेकांच्याकडून व्याजाने कर्ज घेतले होते. मात्र, कर्ज फेडणे अशक्य झालं होतं. सावकारांच्या कर्जाच्या वसुलीसाठी तगादा सुरु होता. त्यातून अनेक सावकारांकडून अपमानित करण्यात आलं होतं. त्यामुळे आत्महत्या आत्महत्या केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी २५ जणांचा विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर १३ सावकारांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, इतर सावकारांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. त्यामागे आणखी काही कारणे आहेत का? या दृष्टीने तपास सुरू आहे. पण प्राथमिक दृष्ट्या उद्योगासाठी कर्ज आणि ते व्याजाने घेतलं पण परतफेड करणं अशक्य झाल्याने वनमोरे कुटूंबाने आत्महत्या केल्याचं स्पष्ट केलं आहे.

Eknath Shinde Tweet : आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, एकनाथ शिंदेंचं बंडानंतर पहिलं ट्विट
अटक करण्यात आलेले सावकारांची नाव याप्रमाणे, नंदकुमार पवार, राजेंद्र लक्ष्‍मण बने, अनिल लक्ष्मण बने, खंडेराव शिंदे, डॉक्टर चौगुले, शैलेश रामचंद्र धुमाळ, प्रकाश पवार, संजय बागडी, अनिल बोराडे, पांडुरंग घोरपडे, शिवाजी कोरे आणि रेखा चौगुले म्हैसाळ यांचा समावेश. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सावकारांच्या मध्ये अनेक सावकारांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. काही सावकारांना हद्दपार देखील करण्यात आलं होतं. यापूर्वीही काही सावकारांच्या जाचाला कंटाळून काही जणांनी आत्महत्या केल्याचे प्रकार घडले आहे.

मस्तच ! वर्षभर फ्रीमध्ये पाहा आवडत्या मूव्हीज आणि वेब सीरीज, ‘या’ स्वस्त प्लान्सचे बेनेफिट्स आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here