अहमदनगर : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज नेमकं काय सुरू आहे?, याकडेही सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत. अजित पवारांनी आज मंत्रालयात विविध बैठका घेतल्या. याशिवाय एक राजकीय कार्यक्रमही त्यांच्या उपस्थितीत झाला. अहमदनगर जिल्ह्यातील भाजपच्या काही पधाधिकाऱ्यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम पूर्वनियोजित असला तरी सध्याच्या राजकीय घडामोडीत लक्षवेधक ठरला आहे.

अजित पवारांचा भाजपला ‘दे धक्का’!

भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील व मधुकर पिचड यांच्या काही समर्थकांना राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गळाला लावले होते. त्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पूर्वीच दिली होती. तो योग नेमका आज जुळून आला. अहमदनगर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, अकोले तालुक्यातील कैलास वाकचौंरे व वसंतराव मनकर यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकीकडे भाजपकडून विधान परिषदेच्या निकालानंतरचा जल्लोष सुरू आहे. नगर जिल्ह्यातून प्रा. राम शिंदे हेही विजयी झाले आहेत.

फडणवीसांचे खास दूत शिंदेंच्या भेटीसाठी सूरतमध्ये; फोनाफोनीनंतर हॉटेलमध्ये एंट्री
भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

अशातच नगरच्या या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार राहुल जगताप, घनःश्याम शेलार, सीताराम गायकर, अशोक भांगरे, कपिल पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके उपस्थित होते. भाजपचे ज्येष्ठ नेते विखे पाटील आणि मधुकर पिचड यांचे हे कार्यकर्ते असल्याने त्या दोघांनाही हा धक्का मानला जात आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षात आलेल्या या नव्या पदाधिकाऱ्यांना काय संधी मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

‘धर्मवीर सिनेमामधील संवाद म्युट करावा लागला’ खरंच OTT वर बदलले संवाद? इथे मिळेल उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here