मुंबई: महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चागलंच तापलं आहे. शिवसेनेचे नेते आमदार एकनाथ शिंदे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदारही आहेत. त्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या सर्व राजकीय नाट्यावर सिनेसृष्टीतील कलाकारांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
‘सध्या एकनाथ शिंदे आणखी १२ आमदारांना घेऊन अज्ञातवासात आहेत, असं मराठी वृत्त वाहिन्यांवर दाखवलं जातय. काही तरी मोठं घडणार असं दिसतंय’, असं ट्विट आरोहनं केलं आहे.
अशीही चर्चा
राज्यसभा आणि विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेपासून शिवसेनेच्या नेतृत्वाने शिंदेंना डावलले असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय अगदी धर्मवीर सिनेमापासूनच शिंदे आणि ठाकरे यांच्यात विसंवाद व्हायला सुरुवात झाल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे.