Eknath Shinde news | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे बंड शमेल, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. एकनाथ शिंदे हे आपल्या १३ समर्थक आमदारांसह सूरतला जाऊन बसले आहेत. तसेच आपल्यासोबत शिवसेनेतील ३५ आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा शिंदे गटाकडून खासगीत केला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यास ठाकरे सरकार पडणार, अशी चर्चा आहे.

हायलाइट्स:
- राज्यातील ठाकरे सरकार धोक्यात असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे
- महाविकास आघाडीच्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण
- राष्ट्रवादी मात्र एकनाथ शिंदे यांचे बंड शमेल, याबाबत प्रचंड आशावादी
काहीवेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या बंडाविषयी विचारण्यात आले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, मी विधानभवनाच्या लायब्ररीमध्ये आले होते. मला या सगळ्याविषयी काहीही माहिती नाही. नक्की काय चाललंय हेच माहिती नाही. पण संध्याकाळपर्यंत सगळं क्लीअर होईल. तेव्हा बघू या, अशी मोघम प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. भाजपच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार तांत्रिकदृष्ट्या अल्पमतात आल्याची हवा केली जात आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका असल्याचे सांगितले.
तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे बंड शमेल, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. एकनाथ शिंदे हे आपल्या १३ समर्थक आमदारांसह सूरतला जाऊन बसले आहेत. तसेच आपल्यासोबत शिवसेनेतील ३५ आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा शिंदे गटाकडून खासगीत केला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यास ठाकरे सरकार पडणार, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, तुम्ही हे सरकार वाचवू शकता का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी म्हटले की, २०१९ साली महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापन झाले तेव्हादेखील आमच्या पक्षाच्या काही आमदारांना उचलून हरियाणात आणण्यात आले होते. पण नंतर ते तिथून निघून आले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि गेली अडीच वर्षे ते कार्यरत आहे. त्यामुळे आताच्या परिस्थितीमधूनही काहीतरी मार्ग निघेल, याबद्दल मला पूर्णपणे विश्वास असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : ncp mp supriya sule on eknath shinde revolt against shivsena
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network