मुंबई: मुंबईत सर्वाधिक दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या धारावीत करोनाचा प्रादुर्भाव अद्याप ओसरलेला नाही. या भागात आज आणखी १६ करोनाबाधीत रुग्ण आढळले असून धारावातील एकूण करोनाबाधीत रुग्णांची संख्या आता ११७ इतकी झाली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर संपूर्ण धारावी सील करण्यात आली आहे. या भागातील संसर्ग कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा पोलिसांच्या मदतीने युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात यश असलं तरी नवीन रुग्ण मात्र अद्याप थांबलेले नाहीत.

धारावीतील आजचा करोनाचा तपशील पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आला असून दिवसभरात करोनाचे १६ नवीन रुग्ण आढळले आहेत. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मरकजहून परतलेल्या व करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या भाचीचाही समावेश आहे. अन्य रुग्णांमध्ये एक पुरुष रुग्ण ६१ वर्षांचा आहे तर बाकीचे रुग्ण १५ ते ४५ वर्षे या वयोगटातील आहेत.

दरम्यान, धारावीत करोनाचे आतापर्यंत एकूण ११७ रुग्ण आढळले असून त्यातील १० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here