पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील दललावाडी भागातील एका इमारतीचे बांधकाम अर्धवट राहिले आहे. सर्व बाजूंनी पत्रे लावून जागा बंद केली आहे. परंतु एका ठिकाणाहून आत जाण्यासाठी रस्ता आहे. त्यातून तीन जण मद्यपान करण्यासाठी गेले असता रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. या वादातून मोहसीन कुरैशी याने दोघांना चाकूने भोसकले. रिजवानच्या छातीवर, पायावर खोलवर वार करण्यात आल्याने तो जागीच ठार झाला. तर वसीम कुरैशी हा गंभीर जखमी आहे. त्याच्याही छातीवर वार केलेले आहेत. त्याच्या छातीतून आणि नाकातून रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, या दोघांना मारणारा मोहसीन घटनेनंतर पसार झाला, परंतु पोलिसांनी त्याला अटक केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दिपक गिऱ्हे, साहाय्यक आयुक्त विशाल ढुमे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्यासह पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.