अमृता फडणवीस या सातत्यानं विविध विषयांवर भाष्य करतात. अमृता फडणवीस या राजकीय भाष्य देखील करतात. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारं ट्विट केलं आणि नंतर डिलीट केलं.

 

Amruta Fadnavis tweet
अमृता फडणवीस यांचं ट्विट डिलीट

हायलाइट्स:

  • अमृता फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांवर ट्विट?
  • अमृता फडणवीस यांचं ट्विट डिलीट
  • ट्विट डिलीट केल्यानं चर्चांना उधाण
मुंबई : महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या २० हून अधिक आमदारांसह गुजरातच्या सूरतमध्ये गेले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्या असताना भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं होतं. अमृता फडणवीस यांनी ते ट्विट डिलीट केल्याचं समोर आलं आहे. मात्र, इतर वेळी आपल्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी ट्विट नेमकं का डिलीट केलं असावं यासंदर्भात तर्क वितर्क सुरु झाले आहेत. अमृता फडणवीस यांच्या ट्विटमधील था या शब्दाला अवतरण चिन्ह देण्यात आलेलं आहे. ‘था’ हा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी वापरला असण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार गेले असले तरी ते शिवसेनेचे आमदार आहेत. अमृता फडणवीस यांच्या ट्विटचा राजकीय परिणाम होऊ शकतो हे लक्षात आल्यावर ट्विट डिलीट केलं गेलं असावं, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बातमी अपडेट होतं आहे…

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : bjp leader devendra fadnavis wife amruta fadnavis delete tweet which focus on maharashtra political crisis and uddhav thackeray
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here