Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर त्यांच्यासोबत कोणते आमदार आहेत याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, मध्यरात्री एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह सुरतहून आसाममध्ये प्रयाण करण्यापूर्वी एक फोटो आणि व्हिडिओही व्हायरल केला आणि कोणते आमदार सोबत आहेत याचा उलघडा झालाच, पण एकप्रकारे शक्तीप्रदर्शनही केले. एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी गुवाहाटी विमानतळावर पोहोचल्यानंतर आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला आहे, त्याचबरोबर आणखी 10 आमदार येतील, असाही दावा केल्याने शिवसेनेच्या पोटात गोळा नक्कीच आला आहे. 

दरम्यान, समोर आलेल्या 40 आमदारांच्या व्हिडिओमध्ये संजय पाटील-यड्रावकर यांचाही समावेश आहे. बैठकीसाठी बोलावल्यानंतर मंत्री यड्रावकर यांनी बंधू संजय पाटील-यड्रावकर यांना पाठवलं होतं. त्यामुळे यड्रावकरांनी दोन्ही दगडावर हात ठेवला आहे का ? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हेदेखील शिवसेनेच्या आमदारांसोबत आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, शिंदे यांनी स्वतंत्र गटासाठी आवश्यक असलेली 37 ही संख्या पूर्ण केली असल्याचे सध्या चित्र आहे. 

दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झाले आहेत. आज भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. सूरतमध्ये मंगळवारी दिवसभरानंतर रात्री उशिराही राजकीय घडामोडी घडल्या. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे पत्र आज राजभवनात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकार अल्पमतात असल्याचे सांगून लवकरच विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल देण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या 37 आमदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाल्यास सरकार थेट अल्पमतात जाण्याची शक्यता आहे. 

एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचे शर्थीचे प्रयत्न

शिवसेना वरिष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे मात्र अद्याप एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत ते म्हणाले, भाजपसोबत जावं हीच पक्ष हिताची भूमिका आहे. मला तुमच्याकडून आश्वासन हवं आहे. मला मंत्रिपद नाही  दिलं तरी चालेल. पण भाजपसोबत  सरकार बनवा. 

एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणते आमदार ?

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या काही आमदारांची नावे समोर आली आहे. यामध्ये ईडी, आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लागलेले प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांचाही समावेश आहे.

1. प्रताप सरनाईक 
2. श्रीनिवास वनगा
3. अनिल बाबर
4. नितिन देशमुख 
5. लता सोनवणे
6. यामिनी जाधव 
7. संजय शिरसाट
8. महेंद्र दळवी
9. भारत गोगवले 
10. प्रकाश सर्वे 
11. सुहास कांदे
12.  बच्चू कडु , प्रहार पार्टी
13  नरेन्द्र बोंडेकर , अपक्ष आमदार अमरावती
14  संजय गायकवाड़ 
15  संजय रायमूलकर 
16 बालाजी  कल्याणकर
17  रमेश बोरनारे
18  चिमणराव पाटील 
19  किशोर पाटील 
20 नितीनकुमार तळे
21 संदीपान भुमरे 
22 महेंद्र थोरवे

इतर महत्त्वाच्या बातम्या 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here