मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्यात कोणे एकेकाळी खूप छान मैत्री होती. परंतु गेल्यावर्षी जेव्हा कार्तिकनं करणच्या दोस्ताना २ सिनेमाबातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं, तेव्हा त्या दोघांमधील वाद जगजाहीर झाले. या दोघांमध्ये दुरावा आल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये असं म्हटलं होतं की, करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शननं कार्तिकला त्यांच्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं आहे. परंतु आता या दोघांमध्ये पुन्हा एकदा मैत्रीचं नातं निर्माण होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला निमित्त ठरलं तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ.

करण जोहर कार्तिक आर्यन

हे वाचा-अक्षय कुमार आणि आमिर खान भिडणार एकमेकांना, दोघांचे सिनेमे एकाच दिवशी होणार प्रदर्शित

अलिकडेच एका कार्यक्रमामध्ये करण जोहर आणि कार्तिक आर्यन एकमेकांच्या शेजारी बसून हसत-खेळत गप्पा मारताना दिसत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. हे दोघं एकमेकांशी अतिशय खेळीमेळीनं बोलताना, वागताना दिसत आहेत. त्यावरून या दोघांमधील दुरावा संपल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काय झालं होतं नेमकं

कार्तिक आणि करण यांच्यामध्ये दोस्ताना २ सिनेमावरून वाद झाला होता. सिनेमात कार्त‍िक आर्यनसह जाह्नवी कपूर, लक्ष्य ललवानी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. परंतु सिनेमाची घोषणा झाल्यानंतर काही महिन्यांतच कार्तिकनं सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. ही बातमी खरी असल्याचं जाहीर झाल्यानंतर धर्मा प्रॉडक्शननं देखील प्रसिद्ध पत्रक काढत सिनेमासाठी नव्यानं कलाकारांची निवड करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर कार्तिकनं कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. दोघांनीही याबाबत मौनच बाळगलं होतं.

हे वाचा-मुलापेक्षा आई सरस! हृतिकच्या ६७ वर्षांच्या आईनं पाण्यात केली योगासनं

दरम्यान, कार्तिकचा अलिकडेच भूल भुलैया २ सिनेमा हिट झाला आहे. या सिनेमात त्याच्याबरोबर कियारा आडवाणी आहे. या दोघांची केमेस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. दरम्यान कार्तिककडे शहजादा, कॅप्टन इंडिया आणि फ्रेडी हे सिनेमे आहेत. करण जोहरच्या कामाबाबत सांगायचं तर येत्या २४ तारखेला त्याचा जुग जुग जियो सिनेमा रिलीज होत आहे. त्यानंतर ब्रह्मास्त्र हा सिनेमा येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here