Shivsena MLA’s with Eknath Shinde | एकनाथ शिंदे गटाचे तब्बल ४० आमदार बुधवारी सकाळी सूरतमधून गुवाहाटीमध्ये दाखल झाले. याठिकाणी त्यांना हॉटेल रॅडिसनमध्ये ठेवण्यात आले आहे. गुवाहाटीत आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट करायला सुरुवात केली. स्वत: एकनाथ शिंदे यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्याकडे सध्याच्या घडीला ४५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.

हायलाइट्स:
- एकनाथ शिंदे आता सातत्याने प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडताना दिसत आहेत
- आम्हाला कोणावरही टीका करायची नाही
- आम्हाला आगामी काळात बाळासाहेबांना अपेक्षित असेललं हिंदुत्त्वाचं आणि विकासाचं राजकारण करायचं आहे
एकनाथ शिंदे गटाचे तब्बल ४० आमदार बुधवारी सकाळी सूरतमधून गुवाहाटीमध्ये दाखल झाले. याठिकाणी त्यांना हॉटेल रॅडिसनमध्ये ठेवण्यात आले आहे. गुवाहाटीत आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट करायला सुरुवात केली. स्वत: एकनाथ शिंदे यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्याकडे सध्याच्या घडीला ४५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. हा आकडा दुपारपर्यंत आणखी वाढेल, अशी शक्यताही शिंदे गटातील आमदारांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार कोसळणार हे जवळपास निश्चित झाले असून या सरकारची उलटगणती सुरु झाल्याचे बोलले जात आहे.
‘आम्हाला बाळासाहेबांच्या विचाराचं आणि विकासाचं राजकारण करायचंय’
एकनाथ शिंदे आता सातत्याने प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. आम्हाला कोणावरही टीका करायची नाही. आम्हाला आगामी काळात बाळासाहेबांना अपेक्षित असेललं हिंदुत्त्वाचं आणि विकासाचं राजकारण करायचं आहे. आम्ही त्यांची विचारधारा घेऊन पुढे जाणार आहोत. आम्ही सगळे बाळासाहेबांच्या विचारांना मानत असल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
‘अद्याप शिवसेना सोडण्याचा विचार केलेला नाही’
शिवसेना सोडण्याचा किंवा राज्यपालांची भेट घेण्याचा अद्याप आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही. बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारे ४० पेक्षा जास्त आमदार माझ्यासोबत आले आहेत. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी आम्ही सत्तेसाठी प्रतारणा करणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : no one beat mla’s they are with me with their own will eknath shinde hits back sanjay raut
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network