Shivsena MLA’s with Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा हा दावा आता खरा ठरताना दिसत आहे. कारण, काहीवेळातच शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड आणि आमदार योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळणार आहेत. संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. तर योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांच्यावर मध्यंतरीच्या काळात उद्धव ठाकरे प्रचंड नाराज होते.

 

हायलाइट्स:

  • योगेश कदम बुधवारी सकाळी गुवाहाटीच्या दिशेने रवाना
  • एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सूरतला जाऊन बंडाचे निशाण फडकावले होते
  • एकनाथ शिंदे यांनी आपल्याला शिवसेनेचे आणखी १० आमदार येऊन मिळतील, असा दावा केला
मुंबई: अवघ्या काही दिवसांपूर्वी ‘मातोश्री’च्या चरणी निष्ठा वाहून आयुष्याच्या शेवटापर्यंत शिवसेनेत राहण्याच्या आणाभाका घेणारे शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेते रामदास कदम यांचे सुपूत्र योगेश कदम हेदेखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गोटात सामील होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी योगेश कदम बुधवारी सकाळी गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता आज दुपारपर्यंत शिवसेनेच्या गोटात एकतरी आमदारा उरेल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सूरतला जाऊन बंडाचे निशाण फडकावले होते. काल दिवसभर त्यांचा मुक्काम सूरतमधील ली मेरेडियन हॉटेलमध्ये होता. मात्र, त्यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, याचा आकडा स्पष्ट होऊ शकला नव्हता. अखेर बुधवारी सकाळी एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटीमध्ये दाखल झाले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आणि सहकारी पक्षाचे मिळून ४० आमदार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्याला शिवसेनेचे आणखी १० आमदार येऊन मिळतील, असा दावा केला होता.
Aadtiya Thackeray: मी फक्त एकाच कार्यक्रमाला उपस्थित राहीन; योगेश कदमांच्या नाराजीमुळे आदित्य ठाकरेंचा दापोली दौरा गाजणार?
एकनाथ शिंदे यांचा हा दावा आता खरा ठरताना दिसत आहे. कारण, काहीवेळातच शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड आणि आमदार योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळणार आहेत. संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. तर योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांच्यावर मध्यंतरीच्या काळात उद्धव ठाकरे प्रचंड नाराज होते. त्यामुळे दापोली जिल्ह्यात मातोश्रीच्या आशीर्वादाने अनिल परब यांनी रामदास कदम गटाचे खच्चीकरण केले होते. कदम गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली होती. त्यामुळे रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या राजकीय भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
रामदासभाई, आपल्याला प्रवाहात राहायचंय, सेकंड इनिंगची सुरुवात जोरदार करा: एकनाथ शिंदे
मात्र, काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आणि रामदास कदम यांचे मनोमीलन झाले होते. त्यावेळी रामदास कदम यांनी आपण मरेपर्यंत पक्षात राहू, शिवसेनेची साथ शेवटपर्यंत सोडणार नाही, असे म्हटले होते. मात्र, आता काही दिवसांतच त्यांचे पूत्र योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटात प्रचंड चिंतेचे वातावरण आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivsena leader ramdas kadam son yogesh kadam will also join eknath shinde group in guwahati
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here