Sanjay Raut on Eknath Shinde: एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतल्यानं शिवसेनेसमोर अभूतपूर्व संकट निर्माण झालं आहे. आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. कालपर्यंत सूरतमध्ये असलेले आमदार आता गुवाहाटीला पोहोचले आहेत.

हायलाइट्स:
- एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार एअरलिफ्ट
- शिंदे आणि आमदार गुवाहाटीला पोहोचले
- शिंदे स्वगृही परततील; राऊतांना विश्वास
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत कितीही आमदार असू द्या. हा आमच्या घरातला विषय आहे. सगळ्या सहकाऱ्यांशी आमचा उत्तम संवाद आहे. ते काँग्रेस, राष्ट्रवादीवर नाराज असतील असं मला वाटत नाही. शिंदेंसोबत सकाळीच संवाद झाला. ते बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेत आहेत. ते माझे केवळ सहकारी नाहीत, तर जीवाभावाचे मित्र आहेत, असं राऊत यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे गेल्या ३५-४० वर्षांपासून शिवसेनेत आहेत. त्यामुळे शिवसेना सोडणं त्यांना सोपं नाही आणि शिंदेंची साथ सोडणं आम्हाला सोपं नाही. शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार लवकरच परत येतील. त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली. शिवसेनेवर अनेक संकटं आली. राखेतून गरुडभरारी घेण्याची ताकद शिवसेनेत आहे. हाच शिवसेनेचा ५६ वर्षांचा इतिहास आहे, असं राऊत म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच हे सगळं करत आहेत, असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. त्यावर शिवसेना पाठीमागून वार करत नाही. आम्ही समोरून कृती करतो, असं उत्तर राऊतांनी दिलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी माझी काल चर्चा झाली आहे. आज मुख्यमंत्री ठाकरे आणि पवार भेटतील. काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेच्या पाठिशी ठामपणे उभी आहे, असं राऊतांनी सांगितलं.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : rebel leader eknath shinde will come back soon says shiv sena mp sanjay raut
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network