मुंबई : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या शक्तीशाली प्रदर्शनापुढे आणि त्यांना असलेल्या आमदारांच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर काहीही पर्याय उरलेला नाहीय. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे आता लक्ष ठेवून राहायचं, असं मुख्यमंत्र्यांचं ठरलेलं असतानाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचं प्लॅन फोडणारं ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरु आहे, असं ट्विट राऊतांनी केलं आहे. म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याचे संकेतच संजय राऊतांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळच बरखास्त होईल.


आदित्य ठाकरेंनी ट्विटर बायोमधून मंत्रिपद हटवलं

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खिळखिळी केल्यानंतर ठाकरे सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. शिंदेशाहीच्या शक्तीप्रदर्शनापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही हतबल आहेत. अशातच सरकार कोसळण्याच्या चर्चा सुरु असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवरुन मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन बायो हटवल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

Aaditya Thackeray: खेळ खल्लास, आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरुन मंत्रिपदाचा उल्लेख हटवला!
एकनाथ शिंदे यांनी मात्र ट्विटरच्या बायोमधून मंत्रिपद हटवलं नाही

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास ३२ ते ३३ आमदार आहेत. शिवसेना आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे आसामच्या गुवाहटीमध्ये पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे यांनी काल ट्विट करुन मी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार सोडला नसल्याचं म्हटलं आहे. आता आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपदाचा उल्लेख हटवला असला तरी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटरवरुन शिवसेनेचा उल्लेख हटवलेला नाही.

आम्ही शिवसेनेसोबत! एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसैनिक रस्त्यावर, औरंगाबादमध्ये निदर्शने
शक्तीशाली ‘शिंदे’शाही, ३५ ते ४० आमदारांचा पाठिंबा!

काल एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांसह सूरतमध्ये पोहोचले. तेथील ले मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे जवळपास ३५ आमदार होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करुन काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची ऑफर दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक यांना चर्चा करण्यासाठी सूरतला पाठवलं. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर रात्री एकनाथ शिंदेसह सर्व आमदारांना एअरलिफ्ट करुन आसामच्या गुवाहाटीत नेण्यात आलं. त्यानंतर पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांनी माध्यमांपुढे येत आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, सोडणारही नाही. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाणार, असं ते म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here