औरंगाबाद : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व आमदारांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. या बंडखोर आमदारांना इशारा देण्यासाठी आज क्रांतिचौक येथे शिवसेनेच्यावतीने निदर्शने करीत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
या वेळी बंडखोर आमदार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख अंबादास दानवे,माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजू वैध, बाडू थोरात, महिला आघाडीच्या प्रतिभा जगताप,सुनीता आहुलवार आदीं उपस्थित होते.