जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या मुलाची प्रकृती बिघडल्याने त्याला पाहण्यासाठी आमदार पाटील हे रात्रीचे मुक्ताईनगरात आले होते. मुलाची भेट घेतली त्यानंतर त्यांना मुंबईवरून फोन आल्यानंतर ते तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
नेमका चंद्रकांत पाटील यांना कोणाचा फोन आला ते शिंदे गटाकडे गेले की उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत कळू शकलेलं नाही. मात्र, ते तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. पाटील यांच्या मोठ्या नगर येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. आम्ही शिवसेनेसोबत! एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसैनिक रस्त्यावर, औरंगाबादमध्ये निदर्शने दरम्यान, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे पक्षातील तब्बल ४६ आमदार फोडून वेगळा ‘संसार’ मांडण्याच्या तयारीत असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सरकार वाचवण्यासाठी कामाला लागले आहेत. बुधवारी सकाळपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. काहीवेळापूर्वीच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी गुप्तचर यंत्रणेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात काय चित्र पाहायला मिळतं हे पुढचा काळच सांगेन.