Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे बुधवारी सकाळी गुवाहाटी विमानतळावर दाखल झाले तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्ष मिळून ४० आमदार होते. त्याचवेळी शिंदे यांनी, आज दुपारपर्यंत शिवसेनेचे आणखी १० आमदार मला येऊन मिळतील, असा दावा केला होता. हा दावा आता खरा ठरताना दिसत आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी सकाळी केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसेनेचे महाराष्ट्रात असलेले आमदार टप्प्याटप्प्याने गुवाहाटीकडे रवाना होताना दिसत आहेत

 

हायलाइट्स:

  • शिवसेनेचे आणखी १० आमदार मला येऊन मिळतील
  • जळगावातील आमदार गुलाबराव पाटील हेदेखील काहीवेळापूर्वीच गुवाहाटीच्या दिशेने रवाना
  • कोकणातील आमदार योगेश कदम आणि संजय राठोड हेदेखील आज सकाळी गुवाहाटीला
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील राजकीय वजन आणि स्थान किती मोठे आहे, याचा प्रत्यय गेल्या काही तासांमध्ये येत आहे. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी सूरतमधील हॉटेलमध्ये मुक्काम ठोकत शिवसेनेविरोधात बंडाचे निशाण फडकवले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल १३ आमदार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता २४ तास उलटल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गोटातील आमदारांचा आकडा जवळपास ४०च्या पल्याड जाऊन पोहोचला आहे.

एकनाथ शिंदे बुधवारी सकाळी गुवाहाटी विमानतळावर दाखल झाले तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्ष मिळून ४० आमदार होते. त्याचवेळी शिंदे यांनी, आज दुपारपर्यंत शिवसेनेचे आणखी १० आमदार मला येऊन मिळतील, असा दावा केला होता. हा दावा आता खरा ठरताना दिसत आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी सकाळी केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसेनेचे महाराष्ट्रात असलेले आमदार टप्प्याटप्प्याने गुवाहाटीकडे रवाना होताना दिसत आहेत.
Sanjay Raut: उद्धव ठाकरे मोठा डाव टाकणार, वाटचाल विधानसभा बरखास्तीच्या दिशेनं, राऊतांचं सूचक ट्विट
अगदी काल संध्याकाळी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीला उपस्थित असणारे शिवसेनेचे जळगावातील आमदार गुलाबराव पाटील हेदेखील काहीवेळापूर्वीच गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते. गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे तडफदार नेते आणि मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ते शिंदेंच्या गोटात जाणे, हा शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. तर कोकणातील आमदार योगेश कदम आणि संजय राठोड हेदेखील आज सकाळी गुवाहाटीला गेले. याशिवाय, नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेला साथ देणाऱ्या अपक्ष आमदार गीता जैन यादेखील एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळतील, अशी शक्यता आहे. गीता जैन या काहीवेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेल्या होत्या. याठिकाणी चर्चा झाल्यानंतर गीता जैन गुवाहाटीला रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आता शिवसेनेचे आणखी काही आमदार एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीत जाऊन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा शब्द खरा ठरताना दिसत आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivsena gulabrao patil sanjay rathod gita jain yogesh kadam will join eknath shinde in guwahati
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here