Maharashtra Political Crisis 2022: एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतल्यानं शिवसेनेसमोर अभूतपूर्व संकट निर्माण झालं आहे. आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे.

हायलाइट्स:
- एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार एअरलिफ्ट
- शिंदे आणि आमदार गुवाहाटीला पोहोचले
- सेनेसोबत असलेले आमदार वेगळ्या विचारात
राज्यात सुरू असलेल्या घडामोडींमुळे मला आश्चर्य वाटलं नाही. त्यामुळे मला धक्का बसला नाही. २ वर्षांपासून आमदारांमध्ये खदखद होती. ती आता बाहेर पडली, असं भोसले म्हणाले. एका विचारानं प्रेरित होऊन जेव्हा लोक एकत्र येतात, तेव्हा त्यांना सोबत ठेवण्यासाठी कोणत्याही ताकदीची, आमिषाची गरज लागत नाही. पण केवळ सत्तेसाठी जेव्हा लोक एकत्र येतात, सत्तेसाठी विचारधारा बाजूल ठेवतात, तेव्हा त्यांना सोबत ठेवण्यासाठी आमिषाची गरज लागते. त्यांना एकसंध ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते, अशा शब्दांत भोसलेंनी सध्याच्या घडामोडींवर भाष्य केलं.
केवळ सत्तेसाठी एकत्र आल्यानं आताची परिस्थिती उद्भवली आहे. जेव्हा या प्रकारे सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्या पक्षातील नेत्यांनी विचार करायला हवा होता. ही व्यवस्था किती काळ टिकणार याचा विचार त्यावेळीच संबंधितांनी करायला हवा होता, असं भोसले म्हणाले. अनेक महापालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा ५ वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. तिथे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं गणित जुळू शकत नाही, याची कल्पना तिथल्या स्थानिक नेत्यांना आहे, असं भोसले यांनी सांगितलं.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : maharashtra political crisis bjp mp udayanraje bhosale reaction on eknath shinde rebellion
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network