चंद्रपूर : शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून निरोप आला असल्याची माहिती चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मविआ वेगळ्या संकटात असल्याने त्यांचा निरोप आला नसेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शिवसेनेतून फुटून बाहेर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणखी काही आमदारांचे समर्थन भविष्यात अपेक्षित असल्याचा मोठा गौप्यस्फोट किशोर जोरगेवार यांनी केला आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील तातडीने मुंबईकडे रवाना झाले होते. पण आता ते थेट गुवाहाटीला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गळाला आणखी एक अपक्ष आमदार लागला असून ते इतरांशी संपर्क करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पुढच्या काळात अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.